शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

समांतर रस्ते डीपीआरमध्ये चौथ्यांदा बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 15:48 IST

सततच्या घोळामुळे कामाला होतोय विलंब

ठळक मुद्दे तातडीने काम सुरू करण्याची मागणी डीपीआर ४४४ कोटींवरून १३८ कोटींवर‘नही’चे अधिकारी दडवताय माहिती

जळगाव : शहरवासीयांचा जिव्हाळ््याचा विषय असलेल्या राष्टÑीय महामार्गाच्या समांतर रस्त्याच्या कामाच्या डीपीआरमध्ये आता चौथ्यांदा बदल झाला आहे. त्यामुळे केवळ प्रकल्प अहवाल बनविण्याचाच घोळ सुरू असून प्रत्यक्ष कामाला मात्र त्यामुळे विलंब होत आहे.डीपीआर ४४४ कोटींवरून १३८ कोटींवरतत्कालीन जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी समांतर रस्त्यांबाबत ‘नही’च्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन डीपीआर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ४४४ कोटींचा डीपीआर तयार करण्यात आला होता. त्यात समांतर रस्त्यांसोबतच सध्याच्या महामार्गावरून उड्डाणपूल, भुयारी मार्गही प्रस्तावित होते. हा डीपीआर मंजुरीसाठी नागपूर कार्यालयात व तेथून दिल्ली कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात केवळ १०० कोटींचा निधीच मंजूर झाला होता.दिल्ली येथे केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागील महिन्यात झालेल्या बैठकीत शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्गाच्या समांतर रस्ते व भुयारी मार्ग आदी कामांसाठी १०० कोटींऐवजी त्यात आणखी २५ कोटींची भर घालून १२५ कोटींची मंजुरी देण्यात आली. त्यामुळे १०० कोटींच्या निधीतून तयार होत असलेल्या प्रकल्प अहवालात बदल करून १२५ कोटींच्या कामांच्या नियोजनाचा समावेश करण्याचे काम सुरू झाले. मात्र प्रत्यक्षात १३९ कोटींचा डीपीआर (डीटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्या (नही) नागपूर येथील प्रादेशिक कार्यालयाकडे २३ मार्च रोजी सादर करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकाºयांनी दिली आहे.आश्वासनाच्या कालावधीत काम सुरू करण्यास विलंब‘नही’कडे प्राप्त १०० कोटींच्या निधीतून तातडीने काम सुरू करण्याच्या मागणीसाठी समांतर रस्ते कृती समितीने रास्ता रोको आंदोलन केले होते, तर डॉ.राधेश्याम चौधरी यांच्या ‘जळगाव फर्स्ट’ने पत्र पाठविण्याची मोहीम राबविली होती. जिल्हाधिकाºयांनी समांतर रस्ते कृती समितीला दिलेल्या लेखी आश्वासनात समांतर रस्त्यांच्या कामाचा डीपीआर १५ फेब्रुवारीपर्यंत करून एप्रिल अखेर प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर हा निधी १२५ कोटींचा झाला. तर आता १३८ कोटींचा डीपीआर प्रत्यक्षात मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. मंजूर निधी पेक्षा जास्त रक्कमेचा डीपीआर पाठविल्याने पुन्हा अडचणी निर्माण होऊन विलंब होऊ नये, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.‘लोकमत’वृत्ताची दखल‘लोकमत’ने मुख्यमंत्री दौºयाच्या पार्श्वभूमीवर समांतर रस्त्यांच्या डीपीआरबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. तसेच डॉ.राधेश्याम चौधरी यांनीही मुख्यमंत्र्यांना टष्ट्वीट केले होते. त्याची दखल घेत प्रशासनाने तातडीने हा डीपीआर मंजुरीसाठी पाठविला आहे.‘नही’चे अधिकारी दडवताय माहिती‘नही’चे प्रकल्प संचालक अरविंद काळे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते. आतापर्यंत शेकडो लोकांचे बळी घेतलेल्या राष्टÑीय महामार्ग क्र.६ च्या समांतर रस्त्यांचा विषय गंभीर असतानाही या अधिकाºयांना मात्र त्याचे गांभीर्य नसल्याचेच अनुभवास येत आहे. महामार्ग चौपदरीकरण असो की, समांतर रस्ते माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. मात्र लोकांच्या संतापाचा उद्रेक झाल्यास या अधिकाºयांनाच त्यास तोंड द्यावे लागणार आहे. ु