शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरण अडीच वर्षात होणार!

By admin | Updated: February 1, 2017 00:11 IST

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा : सपाटीकरणासह भराव मजबुतीकरणाच्या कामास प्राधान्य

धुळे : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या फागणे ते नवापूर (महाराष्ट्र-गुजरात सीमा) या टप्प्याच्या चौपदरीकरणाच्या कामास गती मिळाली असून सध्या संपादित जमिनीचे सपाटीकरण व भरावाच्या मजबुतीकरणास प्राधान्य देण्यात आले आहे. या टप्प्याचे काम 910 दिवसांत म्हणजे सुमारे अडीच वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. तसा करार फागणे-सोनगड एक्स्प्रेस वे लि. कंपनीशी करण्यात आला आहे. परंतु लवकरात लवकर मुदतीपूर्वी काम पूर्ण करण्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रय} असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  नागपूर-सुरत यांना जोडणा:या या महामार्गाच्या जिल्ह्यातील 140 कि.मी.चे टप्प्याचे चौपदरीकरण या अंतर्गत करण्यात येणार आहे. नागरिकांना सुटसुटीत, योग्य, ‘कन्ङोशन फ्री’ व योग्य गतीने वाहतूक जाईल, असा उत्कृष्ट दर्जाचा चौपदरी राष्ट्रीय महामार्ग देशासाठी अर्पण करण्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण बांधील आहे, असेही सूत्र म्हणाले. फागणे ते नवापूर या टप्प्याच्या कामावर देखरेख (सुपरव्हिजन) ठेवण्यासाठी कन्सल्टिंग इंजिनियरिंग ग्रुप (सीईजी) नावाची स्वतंत्र अभियंता (इंजिनियरिंग) कंपनी नियुक्त करण्यात आली आहे. प्राधिकरणाच्या दिल्ली स्थित कार्यालयातून ही नियुक्ती झाली असून कामाच्या दर्जाबाबत तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. चौपदरीकरणाच्या प्राथमिक टप्प्यात मजबुतीकरणाचे (ग्राऊंड कॉम्पॅक) काम केले जात आहे. तसेच महामार्गाच्या वरच्या (पेवमेंट डिझाईन) थराचे काम सुरू असून त्यासाठी भराव टाकण्याचे काम गतीने सुरू आहे. साधारणत: 140 पैकी 80 कि.मी. क्षेत्रात सध्या हे काम सुरू आहे. 80 टक्के संपादित जमिनीचा ताबा मिळाल्याने काम पूर्ण क्षमतेने सुरू झाले. मुरूम, दगड व गिट्टी यांचा वापर करून तसेच टॅँकरने पाणी शिंपडून त्यावर रोलिंग करून थरांचे मजबुतीकरणाचे काम गतीने करण्यात येत आहे. भविष्यातील ‘सिक्स लेन’चीही तजवीज! चौपदरीकरणासाठी भूसंपादन करताना भविष्यातील सहापदरीकरणासाठीही जागेची तजवीज करण्यात आलेली आहे. त्यामुळे पुढे जाऊन महामार्ग सहापदरी करण्याची गरज पडल्यास लगेच कामाला सुरुवात करता येऊ शकेल. तेव्हा भूसंपादन करण्याची गरज राहणार नाही. आताच भविष्याचा विचार करून भूसंपादन करण्यात आले आहे.