शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यासमोर लवकरच होणार रेल्वेचा चौथा बोगदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 14:38 IST

भुसावळ, जि.जळगाव : शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्यासमोर रेल्वेचे तीन बोगदे असून, भविष्यातील शहर व वाहतूक नियोजनाचा विचार करता येथे अजून एक चौथा बोगदा बांधण्याचे प्रयत्न आमदार संजय सावकारे यांनी सुरू केले आहेत. या अनुषंगाने नुकतीच त्यांच्या निवासस्थानी शहरातील विकासकामांबाबत महत्त्वाची बैठक झाली. बैठकीस पालिकेचे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुडकर, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी एम.एस.तोमर, पालिकेचे पंकज पन्हाळे उपस्थित होते.

ठळक मुद्देअर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या जळगाव दौºयात आमदार सावकारे यांनी केली विकासकामांबाबत चर्चाबाजारपेठ ते बसस्टॅण्ड २४ मीटरचा रस्ता होणाररेल्वे गार्डलाईन मार्ग वरणगाव रस्त्याला जोडणार

भुसावळ, जि.जळगाव : शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्यासमोर रेल्वेचे तीन बोगदे असून, भविष्यातील शहर व वाहतूक नियोजनाचा विचार करता येथे अजून एक चौथा बोगदा बांधण्याचे प्रयत्न आमदार संजय सावकारे यांनी सुरू केले आहेत. या अनुषंगाने नुकतीच त्यांच्या निवासस्थानी शहरातील विकासकामांबाबत महत्त्वाची बैठक झाली.बैठकीस पालिकेचे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुडकर, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी एम.एस.तोमर, पालिकेचे पंकज पन्हाळे उपस्थित होते.शहरात विविध ठिकाणी विकासाच्या माध्यमातून होणार असलेल्या बदलांवर चर्चा करण्यात आली. १ आॅक्टोबर रोजी राज्याचे अर्थ तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा जळगाव दौरा होता. या दौऱ्यात मुनगंटीवार भुसावळ येथे आले असता, आमदार सावकारे यांनी शहरातील विकासकामांबाबत मुनगंटीवार यांना माहिती दिली. नगरविकास खात्याकडून या कामांना मंजुरी देण्याचे आश्वासन मुनगंटीवार यांनी दिले . विभागात ‘अ’ वर्ग असलेल्या भुसावळ पालिकेला यावल रोडवरील सेंट अलायसेस शाळेजवळची रेल्वेची दीड लाख स्क्वेअर फूट जागा नवीन इमारतीसाठी देण्यात येणार आहे. तसेच बाजूलाच रेल्वे जीआरपी पोलीस कर्मचाºयांची वसाहत बांधण्यात येणार आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्यासमोर रेल्वेच्या चौथ्या बोगद्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. बोगद्याजवळील व्यावसायिकांची लवकरच बैठक घेण्यात येऊन त्यांना सहकार्याचे आवाहन केले जाणार आहे.शहरातील बाजारपेठ पोलीस ठाणे ते बस स्टॅण्ड रस्ता हा २४ मीटरचा होणार आहे. पुरातन हनुमान मंदिराचाही जीर्णोद्धार होणार असून रेल्वेची भिंत तोडून रस्ता मोठा होणार आहे. पहिल्या टप्प्यात बाजारपेठ ते अमर स्टोअर्स आणि नंतर बसस्टॅण्ड, असा रस्ता तयार होणार आहे.बस स्टॅण्डजवळील रेल्वे गार्डलाईन मार्ग २४ मीटरचा होणार असल्याने येथील रेल्वे कर्मचाºयांची घरे तोडून या ठिकाणी नवीन मोठा मार्ग थेट वरणगाव रोडवर असलेल्या एबीसी शाळेजवळ जोडण्यात येणार आहे. शहरातल बेशिस्त पार्किंगला आळा बसण्यासाठी ‘टू अ‍ॅण्ड लिफ्ट‘द्वारे रस्त्यात पार्किंग केलेल्या बेशिस्त वाहनांना उचलून रस्ते मोकळा श्वास घेतील, असे नियोजन करण्यात आले आहे. 

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षBhusawalभुसावळ