शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरणामुळे महामार्गाचे समांतर रस्ते अशक्यच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 12:18 IST

वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती

ठळक मुद्देदुसºया टप्प्याचे केवळ गाजरच

जळगाव : शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्गाचे लवकरच चौपदरीकरण करण्यात येणार असून,यासाठी ६२ कोटी रुपयांची निविदा देखील काढण्यात आली आहे. मात्र, शहरातील महामार्गाचे चौपदरीकरण होत असल्यामुळे आता समांतर रस्त्यांची आवश्यकता नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे चौपदरीकरणानंतर समांतर रस्ते अशक्यच असल्याची धक्कादायक माहिती मनपाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी ‘लोकमत’ शी खासगीत बोलताना दिली.त्यामुळे सध्या प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून समांतर रस्त्यांबाबत देण्यात येणारे आश्वासन केवळ पोकळ असल्याचीही माहिंती अधिकाºयांनी दिली आहे. समांतर रस्त्याच्या मागणीसाठी संमातर रस्ते कृती समिती व नागरिकांकडून दबाव असल्याने शहरातील महामार्गाच्या चौपदीकरणानंतर समांतर रस्त्यांचे काम केले जाणार असल्याचे खोटे आश्वासन प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून देण्यात येत असल्याचीही माहिती या अधिकाºयांनी दिली आहे.पाईपलाईन स्थलांतराच्या सूचना नाहीसमांतर रस्त्यांचे काम करण्याचा विचार प्रशासनाचा राहिला असता तर मनपाला समांतर रस्त्यांच्या कामासाठी अडचणीची ठरणारी पाणी पुरवठ्याची पाईपलाईन स्थलांतरीत करावी लागणार होती. २५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाºयांकडे झालेल्या बैठकीत मनपाला हे काम १५ दिवसांच्या आतच करावे लागणार होते. मात्र, या बैठकीला दोन महिने होवून देखील हे काम झालेले नाही. याबाबत मनपाचे शहर अभियंता डी.एस.खडके यांना विचारले असता, याबाबत ‘नही’ कडून कोणतेही पत्र मनपाला मिळालेले नाही, चौपदरीकरणाच्या कामात पाईपलाईनचा अडथळा ठरत नसल्याचीही माहिती त्यांनी दिली.समांतर रस्ते न होण्यामागचे कारण1 ६२ कोटी रुपयांमधून राष्टÑीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम शहरात होणार आहे. त्यामुळे महामार्गावरून होणारी बरीचशी वाहतूक नियंत्रणात येणार आहे. त्यामुळे समांतर रस्ते तयार करण्याची आवश्यकता नसल्याचा विचार प्रशासनाकडून करण्यात येत आहे.2 वर्षभरातच शहराबाहेरून बायपासचे काम होणार आहे. त्यामुळे शहरातून जाणाºया महामार्गावरून जाणाºया वाहतुकीची वर्दळ ६० टक्कयांनी कमी होणार आहे. त्यातच शहरातील महामार्गाचे चौपदीकरण झाल्यास महामार्गावर सध्याचा घडीला निर्माण होणरी वाहतुकीची समस्या निर्माण होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळेच समांतर रस्त्यांचे काम केले जाणार नसल्याचे अधिकाºयांनी सांगितले.चौपदरीकरणासाठी निविदेला १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढचौपदरीकरण कामाच्या पहिल्या टप्प्यात होणाºया कामासाठी ६२ कोटी रुपयांची निविदेला ३१ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, आता १० फेब्रुवारीपर्यंत या निविदेला मुदतवाढ देण्यात आल्याची माहिंती ‘नही’च्या अधिकाºयांनी ‘लोकमत’ला दिली आहे. या निविदेची किंमत ७० कोटींवरून ६२ कोटी झाली आहे. या बदलामुळे निविदा दाखल करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. ११ फेब्रुवारी रोजी या निविदा उघडण्यात येणार आहेत.