शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाच्या आर्मसाठी चार मालमत्ता होणार बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:12 IST

सुनावणी प्रक्रिया करून मनपा घेणार निर्णय लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाचे काम महिनाभरात सुरू करण्यासाठी ...

सुनावणी प्रक्रिया करून मनपा घेणार निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाचे काम महिनाभरात सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून हालचाली सुरू असताना, दुसरीकडे मात्र या पुलालगत तयार होणाऱ्या आर्मबाबत अजूनही मनपा प्रशासनाला तोडगा काढता आलेला नाही. त्यात या आर्ममुळे एकूण ४ मालमत्ता बाधित होणार असून, या मालमत्ताधारकांना मनपा प्रशासनाला नुकसानभरपाईची रक्कम द्यावी लागणार आहे. मात्र, मनपाकडून देण्यात येणारी ती रक्कम कमी असल्याने मालमत्ताधारकांनी नुकसानभरपाईची रक्कम घेण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, आता मनपाकडून पुन्हा सुनावणी प्रक्रिया घेण्यात येणार असून, त्यावर तोडगा काढण्याची तयारी आता मनपाने सुरू केली आहे.

गेल्या चार वर्षांपासून पिंप्राळा रेल्वेगेटवरील उड्डाणपूल मंजूर झाला आहे. मात्र, केवळ मनपा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे या कामाला अद्यापही सुरुवात होऊ शकलेली नाही. मनपा प्रशासनाकडून या पुलालगत भोईटेनगर भागाकडून येण्यासाठी आर्म असावा, अशी मागणी केली होती. या मागणीमुळे हे काम अद्यापही सुरू होऊ शकले नव्हते. मात्र, या आर्ममुळे भोईटेनगर भागातील काही मालमत्ता बाधित होणार आहेत. या मालमत्ताधारकांना नुकसानभरपाईची रक्कम देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. याबाबत फेब्रुवारी महिन्यात ठराव करण्यात आला होता. मात्र, चार महिने होऊनदेखील याबाबत कोणताही निर्णय किंवा सुनावणीदेखील होऊ शकलेली नाही.

लवकरच घेतला जाईल वाटाघाटीचा निर्णय

मनपाकडून या मालमत्ता ताब्यात न घेण्यासाठी कोरोनाचे कारण पुढे केले जात आहे, तर मालमत्ताधारकांनी दिलेल्या माहितीनुसार मनपा बाजारमूल्याच्या दरापेक्षाही कमी किंमत देण्याचा प्रस्ताव ठेवत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांनी मनपाचा प्रस्ताव मध्यंतरी फेटाळून लावला होता. आता मनपा प्रशासनाकडून लवकरच सर्व मालमत्ताधारकांना बोलावून घेत पुन्हा वाटाघाटीविषयी चर्चा करणार आहे. त्यानंतरच आर्मचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.