शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील अयोध्या नगरात घरावर हल्ला करणा-या चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 16:00 IST

फायनान्सद्वारे घेतलेल्या मोबाईलच्या हप्त्यातील शंभर रुपयासाठी ललित विकास चौधरी (रा.लिला पार्क, अयोध्या नगर, जळगाव) या तरुणाच्या घरावर हल्ला करणा-या प्रवीण चंद्रकांत वाघ, बग्गासिंग अच्छासिंग टाक (वय २२), प्रेमसिंग अय्यासिंग टाक (वय २०) व मोनूसिंग जगदीशसिंग टाक (वय १९) सर्व रा. तांबापुरा, या चौघांना मंगळवारी सकाळी अटक करण्यात आली तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले.

ठळक मुद्दे९ जण फरार १४ जणांविरुध्द गुन्हा दाखलजखमीची प्रकृती चिंताजनक

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२८  : फायनान्सद्वारे घेतलेल्या मोबाईलच्या हप्त्यातील शंभर रुपयासाठी ललित विकास चौधरी (रा.लिला पार्क, अयोध्या नगर, जळगाव) या तरुणाच्या घरावर हल्ला करणा-या प्रवीण चंद्रकांत वाघ, बग्गासिंग अच्छासिंग टाक (वय २२), प्रेमसिंग अय्यासिंग टाक (वय २०) व मोनूसिंग जगदीशसिंग टाक (वय १९) सर्व रा. तांबापुरा, या चौघांना मंगळवारी सकाळी अटक करण्यात आली तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. मोबाईलच्या हप्त्यातील शंभर रुपयासाठी प्रवीण वाघ याने २५ ते ३० जणांना सोबत आणून ललित याच्या घरावर सोमवारी सायंकाळी सात वाजता हल्ला केला होता. या घटनेत मदतीसाठी आलेला राकेश प्रकाश नारखेडे (वय २३, रा.जुने जळगाव) व अभिषेक उर्फ सोनू किसन मराठे हे दोन जण गंभीर जखमी झाले आहे. या प्रकरणात १४ जणांविरुध्द कलम ३०७ चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांनी रात्रीच धरपकड सत्र राबविले. पाच जण पोलिसांच्या हाती लागले तर अन्य जण फरार होण्यात यशस्वी झाले. दरम्यान, या हल्ल्यात जखमी झालेल्या अभिषेक याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत तर राकेश याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील व भरत लिंगायत यांनी जखमींचे जबाब नोंदविले आहेत.