शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

चौघा आमदारांची 'कवच' यात्रा !

By admin | Updated: August 1, 2014 15:18 IST

राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील आमदारांनी पालकमंत्री संजय सावकारे यांच्यासह मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यात आमदारांनी पालकमंत्र्यांची पाठराखण केल्याचे वृत्त आहे.

 

जळगाव : राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील आमदारांनी पालकमंत्री संजय सावकारे यांच्यासह मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यात आमदारांनी पालकमंत्र्यांची पाठराखण केल्याचे वृत्त आहे. तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर उमेदवारी पक्की करण्याच्या दृष्टीने या भेटीकडे पाहिले जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट झाली. 
त्याचे निमित्त साधत पालकमंत्री सावकारेंसह चाळीसगावचे आमदार राजीव देशमुख, पाचोर्‍याचे आमदार दिलीप वाघ, अमळनेरचे अपक्ष आमदार व राष्ट्रवादीचे सहयोगी सदस्य साहेबराव पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्याबाबत चर्चा केली. मात्र त्या वेळी पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात भेटण्याची सूचना केली. त्यानुसार गुरुवारी राष्ट्रवादी कार्यालयात या आमदारांनी पवार यांची भेट घेतल्याचे व या वेळी पाचोर्‍याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व तालुकाध्यक्षही सोबत असल्याचे समजते.
 
 
■ पाचोर्‍यात महिला जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.अस्मिता पाटील यांनीही उमेदवारीसाठी दावा केलेला असल्याने विद्यमान आमदार दिलीप वाघ यांनी उमेदवारी पक्की करण्यासाठी पालकमंत्र्यांसोबत फिल्डिंग लावली. 
■ अमळनेरमधून अपक्ष निवडून आलेले आमदार साहेबराव पाटील यांनी राष्ट्रवादीने हा अमळनेर मतदारसंघ काँग्रेसकडून मागून घ्यावा या मागणीसाठी चेंडू टाकला.
■ राजीव देशमुख यांनीदेखील उमेदवारी पक्की करणे व विकासकामे मार्गी लावण्याच्या दृष्टीने तर वरिष्ठांची नाराजी ओढवून घेतलेल्या पालकमंत्री सावकारे यांनी आमदारांकडून पाठराखण करून घेत स्वत:चे स्थान पक्के करण्याच्या दृष्टीने भेट घेतल्याचे मानले जात आहे.