शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

ममुराबाद रस्त्यावर ट्रकसह चार लाखाचे खत जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 22:33 IST

यावलकडे खत घेऊन जाणाºया ट्रकमध्ये अचानक शॉर्ट सर्कीट झाला व काही क्षणातच संपूर्ण ट्रकने पेट घेतल्याची घटना थरारक घटना शुक्रवारी सायंकाळी साडे पाच वाजता ममुराबाद गावापासून काही अंतरावर इदगाव रस्त्याला घडली. या आगीत ट्रक व त्यात असलेले रासायिनक खत जळून खाक झाले आहे. चालक व क्लिनरने तत्काळ खाली उड्या घेतल्याने सुदैवाने ते बचावले.

ठळक मुद्देममुराबादजवळ ‘द बर्निंग ट्रक’ चा थरार शार्ट सर्कीटमुळे पेटला ट्रकचालक व क्लिनर बचावले

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,३  : यावलकडे खत घेऊन जाणाºया ट्रकमध्ये अचानक शॉर्ट सर्कीट झाला व काही क्षणातच संपूर्ण ट्रकने पेट घेतल्याची घटना थरारक घटना शुक्रवारी सायंकाळी साडे पाच वाजता ममुराबाद गावापासून काही अंतरावर इदगाव रस्त्याला घडली. या आगीत ट्रक व त्यात असलेले रासायिनक खत जळून खाक झाले आहे. चालक व क्लिनरने तत्काळ खाली उड्या घेतल्याने सुदैवाने ते बचावले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रवींद्र गणेश भंगाळे व मुकुंद गणेश भंगाळे (रा.डांभूर्णी, ता.यावल) हे दोघं जण जळगाव येथून ट्रकमध्ये (क्र.एम.एच.१९ झेड ४२९०)  १०-२६-२६ या खताच्या १८६ तर डीएपीच्या १६० बॅग असे ३ लाख ६० हजाराचे खत घेऊन यावलकडे जात असताना ममुराबाद गाव सोडल्यानंतर काही अंतरावर ट्रकमध्ये अचानक शार्ट सर्कीट झाला. त्यामुळे आग व धूर पसरल्याने भंगाळे यांनी ट्रकच्या खाली उड्या घेतल्या. आगीची ही घटना पाहून रस्त्याने जाणारे वाहनधारकांनी थांबून ट्रकजवळ धाव घेतली. जवळपास पाण्याची सोय नव्हती तसेच अग्निशमन दलाचा बंब पोहचण्या आधीच ट्रक जळून खाक झाला होता.  तीन लाख रुपये किमतीचा ट्रक व सहा लाख ६० हजार रुपये किमतीचे खत असे एकुण ६ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.