शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

दोन अपघातात चार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2017 00:30 IST

पहूर व पातोंडा : साखरपुडा व कामातून परततानाची घटना

पहूर/चाळीसगाव : जिल्ह्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात चार जण ठार झाले असून, चार जण जखमी झाले. पहिला अपघात पहूर, ता. जामनेर येथे, तर दुसरा अपघात पातोंडा, ता. चाळीसगाव येथे झाला.जामनेर तालुक्यातील लहासर (रामपूर) तांड्यावरील चव्हाण परिवार मालखेडा तांडा (ता.पाचोरा) येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते. मालखेडा येथून साखरपुडा आटोपून एमएच-१९-एई-८७३९ क्रमांकाच्या रिक्षाने चव्हाण कुटुंबिय घरी परतत होते. तेव्हा पहूरजवळ पाचोरा रस्त्यावर मालवाहतूक एमएच-२० डीजे-९१९९ क्रमांकाच्या जीपची समोरासमोर धडक झाली. यात रिक्षाचा चुराडा झाला. अपघातात हरी बालचंद चव्हाण (६५) हे जागीच ठार झाले, तर ममराज भिला चव्हाण (६०), सुदाम उखा चव्हाण (५०), शेषराव रतन चव्हाण (६५), दरबार प्रेमराज चव्हाण व आनंदा मैताब चव्हाण हे पाच जण जखमी झाले. वैद्यकीय अधिकारी डॉ.सुजित पाटे यांनी प्राथमिक उपचार करून जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. यातील शेषराव रतन चव्हाण यांचा जळगाव येथे मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सरपंच प्रदीप लोढा,श्याम सावळे, संजय देशमुख, शंकर राजपूत, पोलीस कर्मचारी शिवाजी पाटील, प्रवीण देशमुख, भास्कर बडगुजर यांच्यासह नागरिकांनी मदत केली. पारोळा तालुक्यातील जोगलखेडा येथील प्रवीण बापू  आंभोरे (२१) व सचिन गणेश चव्हाण (२७) हे दोघे चाळीसगाव येथे खासगी कामासाठी आले होते. परतत असताना ही दुर्घटना घडली. हे दोघे चाळीसगावहून मोटारसायकलने (एमएच-१८-सीजी-४२२९) जोगलखेड्याकडे जाताना समोरून भरधाव वेगाने येणाºया वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात दोघेही जागीच ठार झाले. ही घटना घडताच वाहनचालक तेथून पसार झाला. चाळीसगाव शहर पोलीसात दीपक बापू आंभोरे यांच्या खबरीवरुन अज्ञात वाहनचालकािवरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोहेकाँ धर्मराज पाटील करीत आहेत. (वार्ताहर)