शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पुरात बुडून चार जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 21:24 IST

जोरदार पाऊस : नदी व नाल्यांमध्ये पाणीच पाणी

जळगाव : जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असून नदी व नाल्यांंना पूर आले आहेत. या पुरात वेगवेळ्या ठिकाणी चार जणांना जलसमाधी मिळाली आहे. धरणगाव, पाचोरा, जामनेर व अमळनेर तालुक्यात या घटना घडल्या.एका घटनेत धरणगाव तालुक्यात पष्टाणे येथील नाल्याच्या पूरात हातपाय धूण्यासाठी गेलेल्या रामभाऊ एकनाथ पाटील ( वय ४५ ) या शेतकऱ्याचा वाहून गेल्याने मृत्यू झाला. १९ रोजी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान ही घडली. दुसºया घटनेत पाचोरा येथे हिवरा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेला जयेश दत्तात्रय महाजन (वय २२ रा. शिव कॉलनी पाचोरा) याचा मृतदेह गुरुवारी दुपारी ४ वाजेचे सुमारास पाचोरा शहराजवळील वीट भट्टी परिसरात खोल पाण्यात आढळून आला. तिसºया घटनेत पातोंडा ता.अमळनेर येथील सुटवा नाल्यात बुडून राहुल रमेश देवरे (धोबी) (वय २६) या तरुणाचा मृत्यू झाला. सोनखेडी येथून चार आणण्यासाठी तो नदी पोहून पार करत असताना ही घटना गुरुवारी दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान घडली. तसेच जामनेर तालुक्यात बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास कांग नदी पात्रात वाहून गेलेल्या अनिल मोतीलाल राजपुत (वय ४४, रा. जामनेरपुरा) या प्रौढाचा मृतदेह १९ रोजी दुपारी हिवरखेडे जवळ आढळला.हतनूरचे चार तर गिरणाचे आणखी २ दरवाजे उघडलेजोरदार पावसामुळे धरणात पाण्याची मोठी आवक सुरु असल्याने गिरणा धरणाचे २ तर हतनूर धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहे. वाघूर धरणातही समाधानकारक साठा झाला असून सुमारे ९० टक्के ते भरले आहे.