जळगाव : शिवनक्लास करुन घरी जात असताना गुंगीचे औषध सुंगवूनकाही तरुणांनी चार तरुणींचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून त्यातील एक तरुणीने जळगावात उतरुन स्वत:चा बचाव केला आहे. मध्यप्रदेशातील सिरोली जिल्ह्यातील चिकरंजी या गावातून या तरुणींचे अपहरण झाले आहे. रविवारी दुपारी तीन वाजता हा प्रकार उघडकीस आला. मध्यप्रदेशातून रेल्वेने मुंबईकडे जात असताना यातील पुनम सरोदेप्रसाद हलवाई (वय 16) ही तरुणी जळगाव स्टेशन येण्याच्या आधी शुध्दीवर आली. प्रजापत नगराजवळ गाडी हळू झाल्यानंतर पुनमने अपहरणकत्र्याना गुंगारा देत चालत्या गाडीतून खाली उडी घेतली. मदत मिळविण्यासाठी तेथील रहिवाशी लक्ष्मण एकनाथ हातगंडे यांना ती भेटली. हातगंडे यांनी तिला तेथून शनी पेठ पोलीस स्टेशनला आणले. तेथे हद्दीचा दांगडो उभा राहीला. शहर पोलिसांनी केला नातेवाईकांशी संपर्क हातगंडे यांनी या तरुणीला शनी पेठ येथून शहर पोलीस स्टेशनला आणले. तेथे ठाणे अंमलदार विठ्ठल बडगुजर व विजयसिंग पाटील यांनी तिच्याकडून इत्यंभूत माहिती जाणून घेतली. सुनिता, सविता व आणखी एक अशा तीन तरुणी अद्यापही अपहरणकत्र्याच्याच तावडीत असून त्या रेल्वेने पुढच्या प्रवासात निघाल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले. पूनमकडून तिचा मेहुणा अनिल गुप्ता यांचा मोबाईल क्रमांक घेवून त्यांच्याशी संपर्क साधला तर त्यांनी आईवडीलांशी संपर्क साधला. अपहरणाचा गुन्हा दाखल पुनम राहत असलेल्या गावाच्या पोलीस स्टेशनला या तरुणींचे कोणीतरी अपहरण केल्याचा अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल असल्याचे बडगुजर यांनी सांगितले. दरम्यान, तिचे नातेवाईक जळगावला येण्यासाठी निघाले आहेत. चौकशीअंती तरुणीची बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे. पालक आल्यानंतर त्यांच्या ताब्यात तरुणीला दिले जाणार आहे.
चार तरुणींचे अपहरण
By admin | Updated: October 26, 2015 00:45 IST