शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

वेगवेगळ्या घटनेत चौघांचा मृत्यू

By admin | Updated: March 4, 2017 00:50 IST

काळावार : चाळीसगाव आणि भडगाव तालुक्यात अपघात आणि आत्महत्या

चाळीसगाव : गिरणा  परिसरात वेगवेगळ्या चार घटनांमध्ये चौघांचा मृत्यू झाला. चाळीसगाव तालुक्यात तीन तर भडगाव तालुक्यात एक घटना घडली. रेल्वेखाली सापडून वृद्ध ठारचाळीसगावी धावत्या रेल्वे खाली सापडून काशीनाथ महादू कुमावत (रा.  कासारी ता. नांदगाव) (वय ७६) या वृद्धाचा २ रोजी सकाळी साडेसात वाजता मृत्य झाला. ही घटना चाळीसगाव स्थानकादरम्यान घडली. अनोळखी मृतदेहचाळीसगाव येथील स्टेशन रोडवरील राष्ट्रीय महाविद्यालयाच्या भिंती लगत ४० वर्षीय अनोळखी पुरुष पडून असलेला आढळला. त्यास गणेश बाबुलाल मराठे व इतरांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाºयांनी मयत घोषित केले. मयत हा भिकारी असल्याचे सांगण्यात आले. तपास सहा. पोलीस उपनिरीक्षक संजय पंजे करीत आहे.  एकाची आत्महत्या चाळीसगाव शहरातील इच्छादेवी मंदिर परिसरातील राजेंद्र भिमराव पवार (वय २६) याने २ रोजी रात्री राहत्या घरात पंख्यास गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी पत्नी वैशाली हिस डबे पडल्याचा आवाज आल्याने ती उठताच ही बाब लक्षात आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या घटनेबाबत शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.  तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय पंजे करीत आहे.  मोटरसायकल घसरुन तरुणाचा मृत्यूकजगावकडून  गोंडगावकडे वेगात धावणारी मोटरसायकल घसरुन चालकाचा मृत्यू झाला. ही घटना ३ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास चिमणी वीट भट्टीजवळ घडली. याबाबत माहिती अशी की, गोकुळ एकनाथ भराडी (वय ४०, रा. दलवाडे गोंडगाव) हा आपल्या मोटरसायकलने (एम. एच. १९/ सी सी ३२१६) गोंडगावकडे जात असताना त्याची मोटरसायकल घसरुन त्याच्या डोक्यास जबर मार लागल्याने तो जागीच गतप्राण झाला. याबाबत भडगाव पोलिसात नोंद करण्यात आली आहे. तपास पो. हे. कॉ. भागवत पाटील करीत आहे. कार अपघातात चार जखमीकजगाव-  भडगाव मार्गावर झालेल्या अपघातात चार  जण जखमी झाले. २ रोजी  रात्री कजगाव- भडगाव मार्गावरील बालाजी पेट्रोल पम्पा जवळ ट्रक (एम. एच. १७/ टी २०८९) व कार (एम. एच. १७/ व्ही ९७१३) यांच्यात समोरा समोर धडक झाल्याने कार मधील चार जण जखमी  झाले जखमीत राहुल देवीदास पाटील (३४) , प्रमोद क्षीरसागर (३५), कृष्णा गरबड पाटील (५७) आणि भगवान अर्जून पाटील (३०,सर्व रा. पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा) यांचा समावेश आहे.                                            (वार्ताहर)