चाळीसगाव : तालुक्यात बिबट्याचे हल्ले सुरूच असून रविवारी रात्री त्याने भऊर शिवारात एका शेडमध्ये बांधलेल्या जनावरांवर हल्ला करुन चक्क चार गायी आणि दोन बछड्यांना ठार करून फस्त केल्याची घटना घडली. यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये प्रचंड भिती पसरली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने बिबट्याने गुरांना ठार मारण्याची ही पहिलीच घटना असल्याने वनविभागाने तातडीने पावले उचलण्याची मागणीने जोर धरला आहे.भऊर शिवारात रविवारी रात्री बिबटयाने केलेल्या हल्ल्यात चार गायी व दोन बछडे फस्त केल्याचे सोमवारी निदर्शनास आल्याने परिसरात घबराट निर्माण होण्याबरोबरच हल्लेखोर बिबट्या एक की दोन असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, वनविभागाच्या अधिकाºयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला .भऊर शिवारातील शहासिंग जयसिंग पाटील यांच्या शेतामधील गुरांच्या शेडमध्ये बांधलेल्या चार गायी व दोन बछडे यांच्यावर हल्ला करून बिबटयाने त्यांना ठार मारले. यातील काही जनावरांना त्याने खाल्ल्याचे निदर्शनास आले. या बाबत पाटील यांनी या घटनेची माहिती वनविभागाकडे दिली असता वनविभागाच्या अधिकाºयांनी ८ रोजी दुपारी घटनास्थळी जावून पंचनामा केला़दरम्यान, रात्री उशिरापर्यंत या परिसरात पिंजरा लावला जाईल असे वनविभागाच्या अधिकाºयांनी ग्रामस्थांना सांगितले़बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणीसद्यस्थितीत चाळीसगाव तालुका दुष्काळाच्या दाट छायेत आहे. त्यात या परिसरात बिबटयाने धुमाकूळ घातल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे़ आठ दिवसांपूर्वी पिलखोड परिसरात तीन गुरांना ठार मारल्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. परंतु त्याला चकमा देत बिबट्याचा संचार बिनबोभाट सुरू आहे. गेल्या वर्षी बिबट्यामुळे अनेक जणांना जीव गमवावा लागला होता. प्रशासनाने तात्काळ पावले उचलून बिबटयाचा बंदोबस्त करावा अशी मागणी या परिसरातून होत आहे़
बिबट्याच्या हल्ल्यात चार गायी व दोन बछडे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 00:30 IST
चाळीसगाव तालुक्यातील भऊर परिसरात रविवारी रात्री बिबट्याने चार गायी आणि दोन बछड्यांना ठार करून त्यांचा फडशा पाडल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये भिती व्यक्त होत आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात चार गायी व दोन बछडे ठार
ठळक मुद्देपिंजरा लावूनही बिबट्याने दिला गुंगाराएकाच रात्रीतून सहा जनावरे ठार मारल्याची पहिलीच घटना