जिल्ह्यात आजपर्यंत 176 कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेजळगाव - जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या 22 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी 18 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून चार व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.पॉझिटिव्ह आढळलेल्या चारही व्यक्ती या जळगाव शहरातील आहे. यामध्ये मारुतीपेठ, जळगाव येथील 49 वर्षीय महिला, ओंकारनगर येथील 79 वर्षीय पुरुष, प्रतापनगर येथील 32 वर्षीय महिला तर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय येथील 23 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. तसेच आज जिल्ह्यात तीन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. यामध्ये जळगाव येथील एक 50 वर्षीय पुरुष व एक 55 वर्षीय महिलेचा तर चोपडा येथील एका 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे.जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 176 इतकी झाली असून त्यापैकी पंचवीस रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तेवीस रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.
जळगावात आज चार कोरोना बाधित रूग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 20:31 IST