शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

त्या अल्पवयीन मुलावर चौघांनी केले अनैसर्गिक कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:18 IST

जळगाव : बसस्थानकाचा पत्ता विचारणाऱ्या अल्पवयीन मुलाला दुचाकीवर बसवून लूट करणाऱ्या चारही जणांनी या मुलाला निर्जन ठिकाणी नेऊन तेथे ...

जळगाव : बसस्थानकाचा पत्ता विचारणाऱ्या अल्पवयीन मुलाला दुचाकीवर बसवून लूट करणाऱ्या चारही जणांनी या मुलाला निर्जन ठिकाणी नेऊन तेथे अश्लील चाळे व अनैसर्गिक कृत्य केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. आधीच्या दाखल गुन्ह्यात मंगळवारी पोक्सो व अनैसर्गिक कृत्य केल्याचे कलम वाढविण्यात आले आहे. दरम्यान, सम्राट नागेंद्रमणी त्रिपाठी (वय २०, सुप्रीम कॉलनी), शिव पवन इंवर (वय २०), मनीष उर्फ सनी राजेंद्र कोळी (वय २०), ऋषीकेश माधवराव मोरे (पाटील) (वय २१) तिघे रा.सदगुरू नगर, अयोध्यानगर यांना अटक करण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना घडली तेव्हा मुलाने फक्त लुटीचा प्रकार सांगितला होता. घरी गेल्यावर कुटुंबीयाला माहिती दिल्यावर हा प्रकार उघड झाला. त्यानंतर मंगळवारी मुलाचा पुरवणी जबाब घेऊन आधीच्या गुन्ह्यात कलम वाढविण्यात आले. पीडित मुलगा हा शहरात शिक्षणासाठी येतो. गेल्या चार महिन्यापासून ते या मुलावर अनैसर्गिक कृत्य करीत असल्याचे उघड झाले. चौघांनी याचा व्हिडिओ केला असून वारंवार व्हिडिओची दाखविण्याची धमकी देऊन त्याच्याकडून ७० हजार रुपये रोख घेतल्याचे तपासात उघड झाले आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे व सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनीच या प्रकरणात लक्ष घालून पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांना संशयितांच्या शोधासाठी पथक रवाना करण्याच्या सूचना दिल्या. तेजस मराठे, अक्रम शेख, भास्कर ठाकरे आणि बशीर तडवी यांनी तिघांना मंगळवारी मालेगावात मनमाड फाट्याजवळून अटक केली तर ऋषीकेश मोरे याला विजय निकुंभ, उमेश भांडारकर, प्रफुल्ल धांडे, रतन गिते, नासिर शेख, योगेश इंधाटे यांनी जळगावातून अटक केली. न्यायालयात चौघांना १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.