शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाखांच्या चोरीप्रकरणी बोदवडचे चौघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 19:38 IST

नागपूरला चोरी : हजयात्रेकरुला दाखवला ‘हात’

बोदवड : अकोला येथील रहिवासी नईम काजी यांचे १ लाख ८० हजाराचे पाकीट नागरपूर येथे मारल्या प्रकरणी नागपूर रेल्वे पोलिसांनी शुक्रवारी सकाळी बोदवड येथे चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की, अकोला येथील नईम काजी हे हज यात्रेला जाण्यासाठी वैद्यकीय तपासणी करण्यासाठी नागपूर येथे आले होते. तपासणी करून घराकडे परतत असताना मोमीनपूरा येथील एका हॉटेलमध्ये त्यांनी जेवण केले. जेवण करत असताना बाजूच्या बाकावर बसलेल्या आरोपीनींनी त्यांच्यावर पाळत ठेवत त्यांचा स्टेशन पर्यंत पाठलाग केला.नईम काजी हे रेल्वे स्टेशनवर आले असता चोरट्यांनी त्यांच्या खिशातील १ लाख ८० हजाराची रोकड लांबविली.पोलीस आले बोदवडलायाप्रकरणी नागपूर रेल्वे पोलिसात कलम ३७९,३४, ४११, प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी नागपूर पोलिसांचे, पथक शुक्रवारी २ रोजी बोदवड शहरात आले होते. त्यांनी बोदवड पोलिसांची मदत घेऊन पहाटे सहा वाजता शहरातील सतरंजी मोहोल्ला भागात धाड टाकली व भागातील चार संशयित तरुणांना चौकशी साठी ताब्यात घेतले. त्यातील एक संशयित आरोपी आदिलशहा हा मेंढी बाबा यांचा मुलगा असून मुख्य आरोपी आहे, जाबिर, शब्बीर, सद्दाम अशी इतर आरोपींची नावे असून त्यांना संशयावरून ताब्यात घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी संशयित असल्याने त्यांची पूर्ण नावे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला. यानंतर आरोपींना भुसावळ येथे अधिक चौकशीसाठी नेण्यात आले व तेथून सायंकाळी हे पथक नागपूरकडे रवाना झाले. सदर घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. नागपूर रेल्वे पोलीस पथकात एम.शेख, थॉमस, शेळके आदींचा समावेश होता. त्यांना बोदवड पोलिसांनी तपासासाठी मदत केली.