एकाविरुद्ध गुन्हा दाखल
चोपडा : ॲक्सिस बँकेत भरणा केलेल्या ५०० रुपयांच्या सहा नोटा बनावट आढळून आल्या आहेत. याबाबत कांतीलाल प्रेमलाल गुजर
(रा.निमगव्हाण,चोपडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
८ रोजी गुजर याने बँकेच्या शाखेतील रिसायकलर मशीनमध्ये ५०० रुपयांच्या १७ नोटा याप्रमाणे एकूण ८ हजार ५०० रु.चा भरणा केला; मात्र खात्यावर फक्त ५ हजार ५०० रु.च जमा झाल्याचा बँकेकडून मेसेज आला. नंतर चौकशीत या नोटा बनावट असल्याचे आढळून आले. या प्रकरणी बँकेचे उपशाखा व्यवस्थापक तुषार संतोष पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुजर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक अजित साबळे हे करीत आहेत.