शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

माजी आमदार अपघातात बचावले

By admin | Updated: April 4, 2017 01:15 IST

चोपडा : अकुलखेडा गावानजीकच्या गतिरोधकामुळे वाढले अपघात

चोपडा : अंकलेश्वर-ब:हाणपूर महामार्गावर अकुलखेडा गावानजीक सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अनावश्यक गतिरोधक टाकण्यात आलेला आहे. या गतिरोधकामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अंकलेश्वर-ब:हाणपूर महामार्गावर अवजड वाहनांसह छोटय़ा-मोठय़ा वाहनांची सारखी वर्दळ असते. गावानजीक वाहनांची गती कमी व्हावी, अपघात होऊ नये म्हणून वर्दळीच्या रस्त्यावर गतिरोधक  टाकण्यात येत असतात. गतिरोधकामुळे अपघात कमी होतात असे इतरत्र चित्र असले तरी, याच्या उलट स्थिती अकुलखेडा गावानजीक आढळते. अकुलखेडा बसस्थानकापासून चोपडय़ाकडे येणा:या रस्त्यावर  700 ते 800 मीटर अंतरावर गतिरोधक टाकण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे हा गतिरोधक एका मोठय़ा झाडाजवळच टाकण्यात आलेला आहे. झाडाच्या सावलीमुळे तो वाहनचालकाला दिसत नाही. गतिरोधक आल्यावर वाहनचालक एकदम ब्रेक लावतो. त्यामुळे वाहन थांबते. त्यामागचे वाहन पुढच्या वाहनावर आदळते. या गतिरोधकामुळे किरकोळ अपघातांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढलेले आहे. 28 एप्रिल रोजीही डंपर आणि एका चारचाकी गाडीचा अपघात झाला होता. त्याबाबतची बातमी ‘लोकमत’ने 29 च्या अंकात प्रसिद्ध केली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.गतिरोधक टाकल्याने ही जागा अपघातग्रस्त ठरत आहे. सोमवारी  सकाळी माजी आमदार कैलास पाटील यांच्या चारचाकीलाही (क्र.एमएच-बीक्यू 1008) याच ठिकाणी अपघात झाला. सुदैवाने  पाटील बालंबाल वाचले आहेत. पाठीमागून येणा:या गाडीने कारला धडक दिल्याने गाडीचा मागचा      भाग दाबला गेला आहे. या  जीवघेण्या गतिरोधकाबाबत संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.  गतिरोधक टाकण्यास कोणाचा विरोध नाही. मात्र गतिरोधक टाकल्यावर त्याचे नियम पाळणेही तेवढेच गरजेचे असते. एकतर ज्या ठिकाणी गतिरोधक टाकलेला आहे, त्याच्या थोडय़ा अंतरावर त्याची सूचना देणारा फलक लावण्याची आवश्यकता आहे.4मात्र अकुलखेडा येथे टाकण्यात आलेल्या गतिरोधकालगत कुठलाच खुणेचा फलक लावलेला नाही. त्यामुळे वाहनधारकाला गतिरोधक असल्याचे ते लक्षात येत नाही. परिणामी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देणार का? असा प्रश्न वाहनधारक उपस्थित करू लागले आहेत.अकुलखेडा गावानजीक असलेल्या गतिरोधकामुळे माङया गाडीला अपघात झाला. त्यातून मी बालंबाल वाचलो आहे. हा गतिरोधक काढण्याबाबत बांधकाम विभागातील उपअभियंता व संबंधित सहायक अभियंता यांना सूचना केल्या आहेत.                          - कैलास पाटील,माजी आमदार चोपडा