शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील धुळ्यात अतिदक्षता विभागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 20:19 IST

मारहाण प्रकरण: भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ व समर्थकांना अटक व सुटका

अमळनेर : उदय वाघ व समर्थकांकडून मारहाण झालेले भाजपचे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांना धुळ्यातील खाजगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्याात आले आहे. या प्रकरणी बुधवारी रात्रीच भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यासह ७ जणांना अटक करून जामिनावर सोडण्यात आले.या मारहाणीत बी एस पाटील यांच्या नाकाचे हाड मोडले आणि लिव्हरला सूजही आली आहे. बुधवारी सायंकाळी भाजपच्या महायुतीच्या मेळाव्यात दोन मंत्र्यांसमक्ष भर मेळाव्यात भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ व त्यांच्या ६ कार्यकर्त्यांनी डॉ. पाटील यांना जबर मारहाण केल्यानंतर त्यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यानंतर त्यांची तपासणी केली असता त्यांना जबर मार लागलेला आढळून आल्याने त्यांना रात्रीच तातडीने धुळे येथील सिद्धेश्वर रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. डॉ. पाटील यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या नाकात रक्ताच्या गुठळ्या झाल्या असून नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे तर पोटाला मार बसल्याने लिव्हरला सूज आल्याचे व छातीला मुक्का मार लागल्याचे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले असल्याची माहिती त्यांचे शालक डॉ. चंद्रकांत पाटील यांनी दिली.दरम्यान भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ , शहराध्यक्ष शीतल देशममुख , राजेश वाघ , पंकज पवार , संदीप वाघ , देवा लांडगे , ऐयाज बागवान यांना पोलिसांनी रात्रीच अटक करून लगेच जामिनावर सोडले.