शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

माजी नगरसेवक मनोज चौधरींसह चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 21:51 IST

दुर्गा विसर्जन मिरवणुकीत फटाके फोडण्यावरुन खोटे नगरात झालेला चाकू हल्ला व वाद प्रकरणी दोन्ही गटाच्या १३ जणांविरुध्द दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर माजी नगरसेवक मनोज सुरेश चौधरी (वय ३२ रा.जिवराम नगर,जळगाव) यांच्याविरुध्द खुनाचा प्रयत्न केल्याचे वाढीव कलम (३०७) लावण्यात आले आहे. दरम्यान, चौधरी यांच्यासह दोन्ही गटाच्या चार जणांना अटक करण्यात आली आहे, तर माजी नगरसेवक श्याम कोगटासह अन्य संशयित फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्देदुर्गा विसर्जन मिरवणुकीतील वाद मनोज चौधरीविरुध्द खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा तर श्याम कोगटा फरारदोन्ही गटाच्या १३ जणांविरुध्द गुन्हा दाखल

आॅनलाईन लोकमतजळगाव दि, २ : दुर्गा विसर्जन मिरवणुकीत फटाके फोडण्यावरुन खोटे नगरात झालेला चाकू हल्ला व वाद प्रकरणी दोन्ही गटाच्या १३ जणांविरुध्द दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर माजी नगरसेवक मनोज सुरेश चौधरी (वय ३२ रा.जिवराम नगर,जळगाव) यांच्याविरुध्द खुनाचा प्रयत्न केल्याचे वाढीव कलम (३०७) लावण्यात आले आहे. दरम्यान, चौधरी यांच्यासह दोन्ही गटाच्या चार जणांना अटक करण्यात आली आहे, तर माजी नगरसेवक श्याम कोगटासह अन्य संशयित फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दोन्ही गटाच्या १३ जणांविरुध्द गुन्हा दाखलखोटे नगरात रविवारी सायंकाळी साडे सहा वाजता फटाके फोडण्याच्या कारणावरुन दोन मंडळांमध्ये वाद होऊन तुंबळ हाणामारी झाली. यात सागर मुरलीधर पाटील, देवीदास वाघ व गणेश गायकवाड हे तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत.  या वादानंतर पोलिसांनी दोन्ही गटाच्या १३ जणांविरुध्द रविवारी मध्यरात्री गुन्हा दाखल केला. त्यात सागर पाटील याच्या फिर्यादीवरुन माजी नगरसेवक मनोज सुरेश चौधरी व श्याम कोगटा तसेच गणेश गायकवाड, समाधान रामभाऊ पाटील, निलेश शालीग्राम पाटील, धीरज महाजन, सम्राट बेलदार व इतर अशांविरुध्द तर दुसºया गटाकडून मनोज चौधरी यांंच्या फिर्यादीवरुन देविदास प्रल्हाद वाघ, शेख वसिम शेख सुपडू, कपील मुरलीधर पाटील, सागर मुरलीधर पाटील, सुधीर प्रल्हाद पाटील (सर्व रा.खोटेनगर, जळगाव) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.  देविदास व सागर वगळता तिन्ही संशयितांना अटक करण्यात आली आहे.

मनोज चौधरी यांना ३ दिवस कोठडीअटकेतील संशयिताना पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी व सहायक निरीक्षक सचिन बागुल यांनी सोमवारी न्या.एम.एम.चौधरी यांच्या न्यायालयात हजर केले असता मनोज चौधरी यांना तीन पोलीस कोठडी सुनावली तरशेख वसिम शेख सुपडू, कपील मुरलीधर पाटील व सुधीर प्रल्हाद पाटील यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. घटनेतील चाकू व झेड्यांचा रॉड जप्त करणे बाकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.