शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हिंस्त्र प्राण्यांच्या अधिवासाबाबत वनविभागाने माहिती ठेवणे गरजेचे, वन्यअभ्यासकांची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 12:44 IST

बिबटय़ाचा हल्ला प्रकरण

ठळक मुद्देनागरिकांनी सतर्क राहणे आवश्यकअधिवास जपला जावा

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 29 - चाळीसगाव तालुक्यात धुमाकूळ घालणा:या नरभक्षक बिबटय़ाला रोखण्यासाठी सवरेतोपरी प्रयत्न सुरू असून यासाठी नागरिकांना दिलेल्या सूचनांचे त्यांनी पाहणी केले आणि सतर्क राहणे आवश्यक असल्याचे मत वन्यप्रेमींकडून व्यक्त केले जात आहे. इतकेच नव्हे हिंस्त्र प्राणी कोणत्या ठिकाणी आहे, या बाबत वन विभागाच्या अधिकारी, कर्मचा:यांनी माहिती ठेवणेही गरजेचे असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. तसेच जंगलामध्ये मानवी हस्तक्षेप रोखणे काळाजी गरज असल्याचे काही जणांनी सांगितले. चाळीसगाव तालुक्यात बिबटय़ाचा धुमाकूळ वाढतच असून मंगळवारी पहाटे त्याने सहावा बळी घेतला. यापूर्वीच संतप्त झालेल्या नागरिकांच्या संतापामध्ये या घटनेने पुन्हा भर घातली असून प्रशासनास या रोषास सामोरे जावे लागत आहे. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर वन्यप्रेमी, निवृत्त वन अधिकारी यांच्या प्रतिक्रिया  जाणून घेतल्या असता वरील सूर उमटला. 

अधिकारी, कर्मचा-यांनी जागृत रहावेकोणतीही घटना झाल्यानंतर उपाययोजनांना वेग येतो, मात्र त्यापूर्वीच ती कशी रोखता येईल, याबाबत सतर्क राहिले तर घटना टाळता येतात. त्यासाठी वनांमध्ये हिंस्त्र प्राणी कोठे आहे, याची माहिती वन विभागाच्या अधिकारी, कर्मचा:यांनी ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे या प्राण्यांचा शोध घेण्यास मदत होते, असे मत निवृत्त वन अधिकारी सु.सु. पाटील यांनी व्यक्त केले. 

सहकार्य आवश्यकबिबटय़ाचा शोध सुरू आहे. मात्र याबाबत नागरिकांनी बाहेर झोपू नये, उघडय़ावर शौचास जावू नये अशा सूचना देण्यात आलेल्या आहे, त्यांचे पालन करावे. पशूधन उघडय़ावर बांधल्यास पिंज:यातील भक्षाकडे बिबटय़ा येत नाही, त्यामुळे पशूधन बंदीस्त भागात ठेवणे व इतर बाबतीतही नागरिकांनी सतर्क राहून सहकार्य करावे, अशी अपेक्षा मानद वन्य जीव संरक्षक राजेश ठोंबरे यांनी व्यक्त केली. 

अधिवास जपला जावाजंगल तोड मोठय़ा प्रमाणात वाढल्याने प्राण्यांनी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळविला आहे. प्राण्यांचे भक्ष, आसरा नष्ट होत असल्याने त्यांचा अधिवास धोक्यात येऊन अशा घटना वाढत आहे. त्यामुळे सर्वांनी याचा विचार करीत जंगलांमधील मानवी हस्तक्षेप रोखला पाहिजे, असे मत वन्यजीव अभ्यासक अभय उजागरे यांनी व्यक्त केले.  

उपाययोजनांना वेगबिबटय़ाला पकडण्यासाठी कॅमेरे बसविण्यात आले असून पिंजरेही वाढविण्यात आले आहे. बिबटय़ाला रोखण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनीही सतर्क रहावे, असे आवाहन  वन्य जीव अभ्यासक विवेक देसाई यांनी केले.