शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

परप्रांतीय श्रमिकांनी आता घेतला रिक्षांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 12:28 IST

परप्रांतीय श्रमिक आता मुंबईहुन रिक्षाने परतू लागले आहेत.

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : कोरोना संसर्ग रोगाच्या भीतीने व लॉकडाउनमुळे हातावर पोट असलेले श्रमिक मजुरांसह मुंबईतील रिक्षा चालकांनीही मुंबापुरी सोडणे सुरू केले आहे. पायी, दुचाकी, चारचाकी, मालवाहू वाहनांपाठोपाठ आता तीन चाकी आटो रिक्षानेही परप्रांतीय श्रमिकांचा प्रवास सुरू केला असून, झारखंड राज्यात जाणाऱ्या मुंबईतील अनेक रिक्षा सोमवारी मुक्ताईनगरपर्यंत पोहोचल्या होत्या.एरव्ही मुंबई उपनगरात प्रवाशी वाहतूक करणाऱ्या मुंबई पासिंगच्या अनेक रिक्षा सोमवारी सकाळपासून मुंबई नागपूर एशिया महामार्ग क्र. ४७ वर सुसाट धावताना दिसून आल्या, तर काही रिक्षा रस्त्याच्या कडेला थांबल्या होत्या. या रिक्षांचा प्रवास मुंबई उपनगरातून थेट झारखंड राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात जाण्यासाठी तब्बल बाराशे किलोमीटरपेक्षा अधिक अंतराचा आहे.मुंबई उपनगरात रिक्षाचालक म्हणून उदरनिर्वाह करणारे हे श्रमिक आपल्या कुटुंब व नातेवाईकांसह झारखंड जायला निघाले होते. अगदी वैद्यकीय तपासण्या आणि ट्रांझिक पास घेऊन एक रिक्षात दाटीवाटीने ५ ते ७ प्रवाशी प्रवास करीत होते.रविवारी सायंकाळपासून बांद्रा, सायन, दादर आणि ठाणे उपनगरीय परिसरातून निघालेल्या या रिक्षा रात्रभर प्रवास करून सकाळी मुक्ताईनगरपर्यंत पोहोचल्या होत्या. थकलेले श्रमिक रस्त्याचा महामार्गाच्या कडेला ८१ गाव पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनच्या व्हॉल्वमधील पाणी गळती पाहून प्रातर्विधी व अंघोळीसाठी थांबल्या होत्या. अन्न छत्र किंवा मिळेल तेथे जेवण आणि सावली तेथे थांबा आणि पाण्याची सोय तेथे अंघोळ अशी दिनचर्या घर गाठेपर्यंत या श्रमिकांची सोबत कुटुंबातील महिलाही असल्याने त्यांचा हा लांब पल्ल्याचा प्रवास काळजीचा होय."मुंबईत लॉक डाउन असल्यामुळे रिक्षा बंद आहेत. उदरनिर्वाह करण्यास पैशांची चणचण. महानगरात कोरोना रुग्ण वाढत असल्याने कोरोना लागण होण्याचा धोका आहे. कुटुंबाची सुरक्षितता महत्वाची म्हणून रिक्षानेच कुटुंबासह झारखंड येथील आपल्या गावाकडे निघालो आहे."-प्रदीप मंडल, गिरडिह (झारखंड)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuktainagarमुक्ताईनगर