शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

दुकानांची वेळ वाढविण्यासह इतर आस्थापनांना परवानगीसाठी पाठपुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आता चांगलीच नियंत्रणात आली आहे. त्यामुळे निर्बंधांना शिथिलता मिळत अत्यावश्यक सेवेतील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आता चांगलीच नियंत्रणात आली आहे. त्यामुळे निर्बंधांना शिथिलता मिळत अत्यावश्यक सेवेतील दुकानांच्या वेळा वाढविण्यासह इतर आस्थापनांनाही परवानगी मिळण्याची मागणी राज्य शासनाकडे केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली. राज्य शासनाकडून १ जूननंतरची नियमावली जाहीर होईल, त्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असेही जिल्हाधिकारी राऊत यांनी स्पष्ट केले.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने विविध उपाययोजनांना वेग आला. यामध्ये जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पोलीस प्रशासन या सर्वांनी कोरोना नियंत्रणासाठी प्रयत्न केल्यानंतर आता जिल्ह्यातील दररोजची रुग्ण संख्या २००च्या खाली आहे. राज्यामध्ये ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी झाली, त्या ठिकाणी निर्बंध शिथिल करण्याचे संकेत दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी जिल्ह्यात अनेक बाबींना शिथिलता मिळावी याविषयी मागणी केल्याचे सांगितले.

नियमावलीकडे लक्ष

कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने व्यवहार सुरळीत व्हावे अशी अपेक्षा व्यापारी वर्गासह सर्वजण करीत आहेत. सध्या अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी सात ते ११ यावेळेत परवानगी आहे. ही वेळ आता वाढवून मिळावी यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी राज्य शासनाकडे मागणी केली आहे. यासोबतच अत्यावश्यक सेवेतील व्यवहारांव्यतिरिक्त इतरही आस्थापनांना परवानगी मिळावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. मात्र, हे सर्वच व्यवहार एकसोबत सुरू होतील असे नाही, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दुकानांची वेळ वाढविणे अथवा इतर आस्थापनांना परवानगी देणे या विषयीचे अधिकार जिल्हा पातळीवर देण्यात यावे, अशी मागणी देखील जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

१ जूननंतर दुकानांच्या वेळा वाढतील किंवा इतर दुकाने सुरू होतील की नाही हे आता राज्य शासन नियमावली जाहीर करेल त्यानंतर स्पष्ट होणार आहे.