शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

सुलवाडे-जामफळ योजनेच्या निधीसाठी केंद्राकडे पाठपुरावा- मुख्यमंत्री

By admin | Updated: May 17, 2017 17:04 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे जिल्हा दौ:यादरम्यान घोषीत केले.

ऑनलाइन लोकमतधुळे, दि. 17 - जिल्ह्यातील जलयुक्त शिवारची कामे 20 जूनर्पयत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून दोन ते तीन तालुक्यांचे चित्र पालटू शकेल, अशा सुलवाडे-जामफळ योजनेला मान्यता दिल्याचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे जिल्हा दौ:यादरम्यान घोषीत केले. त्यासाठी लागणा:या निधीची केंद्राकडे मागणी करणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांचे बुधवारी दुपारी साळवे येथील हेलिपॅडवर आगमन झाले. यावेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री तथा ग्रामविकास राज्यमंत्री  दादा भुसे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी  ओमप्रकाश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक एम.रामकुमार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, सरपंच शकुंतला गिरासे उपस्थित होते. डिजिटल शाळांचे उत्कृष्ट काममुख्यमत्री फडणवीस यांनी शिंदखेडा तालुक्यातील साळवे येथील जिल्हा परिषद शाळेस भेट देऊन तेथील डिजिटल शाळा उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी त्यांनी विद्याथ्र्यांशी संवाद साधला. या सोबतच साळवे येथील विविध विकास कामांना भेटी देऊन पाहणी केली. त्यांनी जलयुक्त शिवार अभियानातील कामे, रमाई आवास योजना, फळबाग लागवड योजनच्या उपक्रमासही भेट दिली.आवास योजना लाभार्थीशी साधला संवादमुख्यमंत्री फडणवीस यांनी रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल लाभार्थी रोहिदास वाघ आणि सीताबाई वाघ यांच्या घरांना भेट देऊन संवाद साधला. त्यानंतर त्यांनी जलयुक्त शिवार अभियानातील नाला खोलीकरण कामाची  पाहणी केली.फळबाग लागवड योजनेचे कौतुकसाळवे- शिंदखेडा मार्गावरील दरखेडा येथील रोजगार हमी योजनेतील फळबाग लागवड योजनेसही मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट देऊन लाभार्थी नटराज भटा पाटील यांच्याशी संवाद साधला आणि पिकाची माहिती घेतली. या वेळी त्यांनी फळबाग लागवड योजनेतून केलेल्या डाळींब लागवडीचे त्यांनी कौतुक केले. पुढील वर्षार्पयत धुळे जिल्हा हगणदारीमुक्तस्वच्छ भारत अभियानांतर्गत धुळे जिल्ह्यात चांगले कामे झाले असून जिल्ह्यात 50 हजार स्वच्छतागृह बांधली आहे. 26 जून 2018र्पयत धुळे जिल्हा हगणदारीमुक्त करण्याचा मनोदय असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.  जययुक्त शिवार, नरेगाच्या कामांचा आढावा घेतल्याचे सांगून चांगली कामे झाल्याची पावती त्यांनी दिली.