शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

युध्द कलेच्या प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष

By admin | Updated: February 20, 2017 01:17 IST

मराठी प्रतिष्ठानतर्फे आयोजन : तलवारीने हातावर व डोक्यावर फोडले नारळ

जळगाव : मराठी प्रतिष्ठानतर्फे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर शिवजयंतीनिमित्ताने युध्दकलेचे प्रात्यक्षिक तसेच पोवाडय़ाचे आयोजन करण्यात आल़े यादरम्यान तलवारीने डोक्यावर नारळाचे दोन तुकडे करणे, हातावर काकडीचे दोन तुकडे करणे, वेगाने दांडपट्टा, भाला चालविणे या सारख्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी नागरिकांचे लक्ष वेधले.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमास सुरुवात झाली़ महापौर नितीन लढ्ढा, जिल्हा सरकारी वकील अॅड़ केतन ढाके, दलूभाऊ जैन, शिवरत्न दादा नेवे, प्रा़अजित वाघ, डॉ़ राधेशाम चौधरी, सुरेश पाटील, नगरसेविका ज्योती चव्हाण, नगरसेविका सुचीता हाडा, नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, गजानन मालपुरे, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रविण वाडीले, किशोर भोसले उपस्थित होत़े सूत्रसंचालन मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड़जमील देशपांडे यांनी केल़े पोवाडे सादरकार्यक्रमात प्रसिध्द कै़शाहीर दिलीप सखाराम जोशी यांचे पूत्र संग्राम जोशी, संदीप जोशी यांनी  पोवाडे सादर केले. त्यांना हार्मोनियमवर पांडुरंग सोनवणे, ढोलकी प्रविण महाजन तसेच संदीप सपकाळे, दिवीज जोशी यांनी साथसंगत दिली़ खजानसिंग छाबडा यांचे कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभल़े यशस्वितेसाठी प्रतिष्ठानचे विजयकुमार वाणी, प्रमोद ब:हाटे, शरद पाटील, किरण कासार, जयश्री मालपुरे,  अमित यादव, संजीवनी तायडे, हर्षाली चौधरी यांनी परिश्रम घेतल़ेकोपरी, ठाणे येथील कालकाई माता मित्र मंडळाने दानपट्टा, ढाल-तलवार, लाठी-काठी,भाला यांची थरारक प्रात्यक्षिक सादर केली़ यात विठोबा पार्टे, बारकु भोसले, बबली मालुसरे, बंटी मालुसरे, अंकुश भोसले, विजय म्हात्रे, मंगेश दामंगे, अभिषेक पार्टे यांचा सहभाग होता़ तलवारीचे सहाय्याने डोक्यावर नारळ, तसेच हातावर काकडी कापतांना अंगावर काटे उभे राहिले होत़े प्रात्यक्षिकांसाठी वसाहतींमधील, रस्त्यावरून ये-जा करणा:या नागरिकांनी गर्दी केली होती़ नागरिकांनी प्रात्यक्षिकानंतर टाळ्यांव्दारे दाद देवून कलाकारांचा उत्साह वाढविला़