शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बासरीवादनाने रसिक सुखावले

By admin | Updated: January 7, 2017 00:40 IST

बालगंधर्व संगीत महोत्सव : गुंदेचा बंधुंच्या धृपद गायनाने जिंकली रसिकांची मने

भूषण खैरनार ल्ल जळगाव बालंगधर्व महोत्सवाचा आजचा दुसरा दिवस. सुरुवातीला दीपक चांदोरकरांनी प्रेक्षकांच्या अनुपस्थिती मुळे कार्यक्रम 55 मिनिटे उशीरा सुरु होत आहे. याबद्दल खंत व्यक्त केली. त्यानंतर पंडीत उमाकांत गुंदेचा व रमाकांत गुंदेचा तसेच पखवाज (मृदुंग) वादक अखिलेश गुंदेचा यांचा परिचय करुन दिला. त्यानंतर दोघी बंधुंनी आपल्या धीरगंभीर आवाजात मारवा रागाच्या रिषभात प्रवेश केला व हळूहळू वातावरण मारव्याचा सुगंध दरवळू लागला. संथगतीने नोमतोमची आलापी सुरू झाली. जेव्हा पंडीतजींनी मंद सत्पकातील षड्ज व निषाद रिषभ-धैवत लावले तेव्हा मारव्याचा रंग आणखी गडद झाला. क्रमाक्रमाने वाढत जाणा:या लयीत नुम तुमचे आलाप हे वातावरण उजिर्त करणारे होते.त्यानंतर पंडीतजींनी अनाहत नाद उपासत वायू मंद मंद न्यारो बादल ही चौतालातील बंदीश अतिशय दमदार आवाजात व धृपदमध्ये येणा:या वेगवेगळ्या लयीत सादर केले. त्याच बरोबर अखिलेश गुंदेचा यांनी लयकारी वाजवून रसिकांना मंत्रमुग्ध केले.यानंतर अडाणा रागातील शिवस्तुतीने या सत्राचे समापन केले. या निमित्ताने जळगावकर रसिकांना सुलफाक्ता. यानंतर अडाणा रागातील सुलफाक्ता तालातील द्रुतलयीतील शिवस्तुतीने पंडीतजींनी या सत्राचे समापन केले.दुस:या सत्रात सुचिस्मीता व देबोप्रिया यांनी राग जोगने बासरी वादनाला सुरुवात केली. आलाप-जोड-झाला. दोघींच्या सहवादनाने जोग फुलला. त्यानंतर झपतालाला सुरुवात झाली. ओजस आडीया यांनी झपताल अतिशय डौलदार पद्धतीने सादर केला. त्यावर दोघी अलगदपणे एकापाठोपाठ आलापी, लयकारी व ताना अतिशय सफाईदारपणे सादर करत होत्या. दोघींमध्ये जुगलबंदी नाही तर सहवादनच होत होते.त्यानंतर द्रुत तीनतालात दोघींनी आपल्या बासरी वादनाने कसब दाखवून एक सुखद आनंद उपस्थितांना दिला.या सत्राचे समापन या दोघी फ्ल्युट सिस्टर्सनी बांगला कीर्तन सादर केले. या निमित्ताने जळगावकर रसिकांना रविंद्र  संगीताची अविट गोडी चाघायला मिळाली व तृप्तीचा अनुभव आला. एकंदरीत महोत्सवाच्या दुस:या दिवसाची सुरुवात बुलंद धृपद गायकीने व त्यातल्या दमदार पखवाज साथीने झाली. त्याच नजाकतीने दुस:या सत्रात बासरी वादनाने सहवादन सादर केले.या कलाकारांना रसिकांनी भरपूर दाद दिली.