शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भडगाव तालुक्यातील कजगाव येथे उड्डाण पूल व जोडरस्ता कामांचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 23:18 IST

कजगाव येथील रेल्वे उड्डाण पूल व जोडरस्ता कामाचे भूमिपूजन आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देपुलामुळे कजगाव पारोळा मार्गावरील तसेच प्रसिद्ध अशा श्री क्षेत्र कनाशी या मार्गावरील रहदारीचा मोठा प्रश्न सुटणारयाबरोबरच कजगावच्या सुंदरतेत भर पडणार

कजगाव ता भडगाव, जि.जळगाव :  येथील रेल्वे उड्डाण पूल व जोडरस्ता कामाचे भूमिपूजन आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार पाटील म्हणाले, दरवर्षी दुष्काळ परिस्थिती निर्माण होत आहे, कमी पर्जन्यमानामुळे छोट्या नद्यांना पाण्याचे प्रमाण कमी आहे यासाठी धरणातील वाया जाणारे पाणी छोट्या नदीत टाकले तर त्या रिचार्ज होतील यासाठी धरणातील पाणी पाटणादेवीच्या उमगावरून नदीपात्रात आणण्याचा प्रयत्न करीत आहे.या वेळी व्यासपीठावर जि.प.सदस्य संजय पाटील, जि. प.गटनेते रावसाहेब पाटील, भडगाव पंचायत समितीचे सभापती रामकृष्ण पाटील, जि.प.सदस्य जालींदर चित्ते, शिवसेना जिल्हा उपप्रमुख गणेश परदेशी, गणेश पाटील, युवराज पाटील, पंचायत समिती सदस्य रावण भिल, शेतकरी संघटना तालुकाप्रमुख अनिल पाटील, माजी सभापती कैलास पाटील, तालुका प्रमुख विलास पाटील, सुमित पाटील, भोरटेक सरपंच उमेश पाटील, कजगावचे दिनेश पाटील, बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता वींरेंद्र राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलेबहु प्रतिक्षित अशा या उड्डाणपुलास सन २०१६ मध्ये मान्यता मिळाली होती, मात्र वर्क आॅर्डर (कायार्रंभ) सन २०१८ मध्ये मिळाली. ६५० मीटर लांबी १३ मीटर रुंद असलेल्या १७ कोटी ३३ लाख रुपये खर्चाच्या उड्डाणपुलाचे भूमिपूजन ४ रोजी आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते झाले. या पुलामुळे कजगाव पारोळा मार्गावरील तसेच प्रसिद्ध अशा श्री क्षेत्र कनाशी या मार्गावरील रहदारीचा मोठा प्रश्न सुटणार आहे. याबरोबरच कजगावच्या सुंदरतेत भर पडणार आहे. 

 

टॅग्स :PoliticsराजकारणBhadgaon भडगाव