शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

झोपडीतून घेतली वर्कशॉर्पयत भरारी

By admin | Updated: June 3, 2017 14:23 IST

एवढेच नाहीतर यांना उत्कृष्ट शेतीपयोगी अवजारे बनविल्याबद्दल त्यांना दोनदा शासानाचा पुरस्कार मिळाला आहे.

विजय पाटील  / ऑनलाईन लोकमतआडगाव, जि. जळगाव, दि. 3 - उंबरखेडेचे रहिवासी व आडगाव येथील कल्पेश इंजिनीअरिंग वर्कशॉपचे मालक अशोक शिवाजी चव्हाण यांनी झोपडीतून आपल्या व्यवसायाची सुरुवात करत वर्कशॉप र्पयत मजल मारली आहे. एवढेच नाहीतर यांना उत्कृष्ट शेतीपयोगी अवजारे बनविल्याबद्दल त्यांना दोनदा शासानाचा पुरस्कार मिळाला आहे.  अतिशय कठीण परिस्थितीतून वर आलेले अशोक चव्हाण यांचा  इतिहास पाहिल तर उंबरखेड येथे एका छोटय़ाशा झोपडीत वडील शिवाजी चव्हाण यांनी  लोहाराचा व्यवसाय सुरू केला. त्यांना तीन मुले व दोन मुली. अत्पल्प मजुरीवर एवढय़ा मोठा कुटुंबाचा रहाटगाडा चालवायचा कसा? असा  प्रश्न शिवाजी चव्हाण यांच्यासमोर ठाकला होता. मुलगा अशोक चव्हाण यांनी आपल्या आई-वडिलांना व्यवसायात मदत करून  प्राथमिक व माध्यमिक शिक्षण उंबरखेडे येथे पूर्ण केले. पुढे त्यांनी आपला व्यवसाय वाढावा व भावांच्या हातालाही काम मिळावे म्हणून  गावातील काही नागरिकांच्या सहकार्याने आडगावजवळ साधारणत: 20 आर इतकी जमीन घेतली. सदर जमिनीवर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा उंबरखेडच्या सहकार्याने अत्याधुनिक यंत्रासह भले मोठे वर्कशॉप उभारले. त्यात त्यांनी ट्रॅक्टरचे पलटी नांगर व टिलर बनविण्याचा व्यवसाय सुरू केला.  चव्हाण यांचे नांगर व टिलर तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात शेतक:यांचे पसंतीचे अवजार ठरल्याने  मागणी वाढली. यामुळेच त्यांना मागील महिन्यात जळगाव काही वर्षापूर्वी झालेल्या शेतकरी मेळाव्यात राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री एकनाथराव खडसे व विशेष सहकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते पंजाबराव देशमुख राष्ट्रीय कृषी रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नंतर पुन्हा 26 जानेवारी 2016 रोजी मालेगाव येथील एका कार्यक्रमात कृषी अवजारात विशेष कामगिरी केल्याबद्दल सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी अशोक चव्हाण यांचे कुटुंब, उंबरखेड व आडगाव येथील नागरिक उपस्थित होते.