वरणगाव, जि़ जळगाव- तूर खरेदीसंदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तूर खरेदीसंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर गुरुवारी सकाळी 11 वाजता शिवसैनिकांतर्फे बसस्थानकात चौकात धिक्कार आंदोलन करण्यात आल़े दानवे यांच्या प्रतिमेला प्रसंगी चपलांचा हार घालून वक्तव्याचा निषेध करण्यात आला़ तालुका प्रमुख समाधान महाजन, विलास मुळे, सुनील कोळी, अरबाज खान, निलेश ठाकूर यांच्यासह शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होत़े
वरणगावात रावसाहेब दानवेंच्या प्रतिमेला चपलांचा हार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2017 13:11 IST