तहसील कार्यालय
येथील ध्वजारोहण तहसीलदार अनिल गवांदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार चिमणराव पाटील, उपसभापती अशोक पाटील, नायब तहसीलदार पाडवी, बी.आर. शिंदे यांच्यासह सामाजिक, राजकीय, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पंचायत समिती
येथील ध्वजारोहणप्रसंगी गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे यांच्यासह पंचायत समितीचे पदाधिकारी विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
नगर परिषद
येथील ध्वजारोहण नगराध्यक्ष करण पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष दीपक अनुष्ठान, आरोग्य सभापती नवल चौधरी, नगरसेविका जयश्री बडगुजर यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, व्यापारी, नागरिक विविध विभागाचे विभागप्रमुख कर्मचारी उपस्थित होते.
कृषी उत्पन्न बाजार समिती
कृषी उत्पन्न बाजार समितीचे ध्वजारोहण सभापती अमोल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसभापती दगडू पाटील, संचालक डॉ. पी.के. पाटील, सचिव रमेश चौधरी यांच्या व्यापारीसह हमाल मापाडी, कर्मचारी उपस्थित होते.
किसान महाविद्यालयात
येथील ध्वजारोहण प्राचार्य डॉ. वाय. व्ही. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डॉ. जी.एच. सोनवणे, डॉ. ए.टी. गव्हाळे यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयात
येथील ध्वजारोहण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रोहन मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. डी. आर. पाटील यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
श्री शिवाजी हायस्कूल
येथील ध्वजारोहण शाळेचे मुख्याध्यापक जी.बी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आदर्श शिक्षक स. ध. भावसार, रंगराव पाटील, दिलीप मालपुरे, दिलीप शिरूडकर, ज्येष्ठ शिक्षक वाय. टी. पाटील आदी उपस्थित होते.