तहसील कार्यालय
भडगाव तहसील कार्यालयाचे शासकीय ध्वजारोहण तहसीलदार सागर ढवळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलिसांनीही ध्वजास मानवंदना दिली. यावेळी निवाशी नायब तहसीलदार रमेश देवकर, संजय गांधी नायब तहसीलदार महेंद्र मोतीराय, पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, पोलीस उपनिरीक्षक आनंद पठारे यांच्यासह पोलीस कर्मचारी, महसूल कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक उत्तमराव देसले आदी उपस्थित होते.
पंचायत समिती
भडगाव पंचायत समितीचे ध्वजारोहण सभापती डाॅ. अर्चना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसभापती रावण भिल्ल, गटविकास अधिकारी आर. ओ. वाघ, सहायक गटविकास अधिकारी संजय लखवाल, विस्तार अधिकारी टी.पी. मोरे, गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी, कार्यालयीन प्रमुख दिलीप चिंचोरे यांच्यासह विभागवार अधिकारी, कर्मचारी हजर होते.
नगर परिषद
भडगाव नगर परिषदेत ध्वजारोहण पाचोरा उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक विक्रम बांदल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांचेसह अधिकारी, कर्मचारी हजर होते.