शहरं
Join us  
Trending Stories
1
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
2
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
3
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
4
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
5
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
6
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
7
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
8
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
9
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
10
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
11
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
12
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
13
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
14
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
15
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
16
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
17
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
18
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
19
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
20
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...

पाचोरा तालुक्यातील २० गावे ‘पोखरा’ योजनेत सामाविष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2019 5:50 PM

हवामान अनुकूल कृषी पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने पाचोरा तालुक्यात ‘पोखरा’ योजना राबविली जात आहे. प्रायोगिक तत्वावर या योजनेत पाचोरा तालुक्यातील ११ गावांत प्रारंभ करण्यात आला.

ठळक मुद्देपहिल्या टप्प्यात ११ गावे तर दुसऱ्या टप्प्यात नऊ गावाचा समावेशपाचोरा तालुक्यातील तारखेडा बुद्रूक येथे कार्यशाळेत राजेंद्र एडके यांचे मार्गदर्शन

आत्माराम गायकवाडखडकदेवळा, ता.पाचोरा, जि.जळगाव : हवामान अनुकूल कृषी पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने पाचोरा तालुक्यात ‘पोखरा’ योजना राबविली जात आहे. प्रायोगिक तत्वावर या योजनेत पाचोरा तालुक्यातील ११ गावांत प्रारंभ करण्यात आला.प्रोजेक्ट आॅन क्लायमेट रिजीनल अ‍ॅग्रीकल्चर (पोखरा) प्रकल्प राज्य शासन ‘नानासाहेब कृषी संजीवनी प्रकल्प’ या नावाने राबवित आहे. ‘जीपीएस आणि वॉटरशेड मॅप’च्या माध्यमातून पाचोरा तालुक्यातील २० गावांची त्यासाठी निवड झाली आहे. योजनेचा शुभारंभ तालुक्यातील ११ गावांतून करण्यात आला. प्रायोगिक तत्वावर ही योजना राबवली जात आहे. निर्धारित वेळेपेक्षा कमी कालावधीतच ही योजना पूर्ण करण्यासाठी कृषि विभाग प्रयत्न करीत आहे. आता पहिल्या टप्प्याचे नियोजन केले जात आहे. ११ गावांमध्ये योजनेचा लाभ दिला जाणार आहे. दुसºया टप्प्यात नऊ गावांना लाभ दिला जाणार आहे. या योजनेचे लाभार्थी निवड करण्यासाठी गावात ग्राम कृषी संजीवनी समिती निर्माण केल्या आहेत. या समितीने ठराव घेऊन निवडलेले लाभार्थीच योजनेसाठी पात्र ठरतात. यातून वानिकी आधारित शेती अंतर्गत १२ फळझाडांची लागवड करता येते. क्षारपड व चोपन जमिनीचे व्यवस्थापन, फळशेती, एकात्मिक शेती पद्धतीत शेळी, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, मधुमक्षिका, मत्स्यपालन, जमीन आरोग्य सुधारणे अशा अनेक योजनांचा यात समावेश आहे. यासाठी जागतिक बँकेडून चार हजार कोटींचे अर्थसहाय्य मिळणार आहे. हा प्रयोग यशस्वी ठरण्याचे नियोजन कृषी विभागाने पहिल्या टप्प्याचे काम सुरू केले आहे. ही योजना आता पाचोरा तालुक्यातील ११ गावात राबविली जाणार आहे.त्यानंतर दुसºया टप्प्यातील नऊ गावे सामाविष्ट केलेली आहेत.पहिल्या टप्प्यातील ११ गावे सामाविष्टतारखेडा खुर्दे, तारखेडा बुद्रूक, अतुर्ली बुद्रूक, अतुर्ली खुर्दे, अतुर्ली खुर्द, बांबरुड खुर्दे प्र.पा., गाळण बुद्रूक, हनुमान वाडी, पुनगाव, ओझर, भातखंडे खुर्दे या गावांचा समावेश आहे.दुसºया टप्प्यातील नऊ गावेदोघी, कळमसरे, कासमपुरे, लोहार, म्हसास,रामेश्वर, सार्वे खुर्दे प्र.भ, शाहापुरे, बंडाळी ही गावे दुसºया टप्प्यात आहेत.हा प्रकल्प राबविण्यात आलेल्या तारखेडा बुद्रुक, गाळण बुद्रुक, तारखेडा खुर्द व हनुमान वाडी या गावात एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत तारखेडा बुद्रुक, बाळद बुद्रुक, तारखेडा खुर्द, हनुमान वाडी या गावांचे कृषी संजीवनी समिती अध्यक्ष, सरपंच, कृषी सहाय्यक व समूह सहाय्यक तसेच सचिन चौधरी, लेखा सहाय्यक उपस्थित होते. कार्यशाळेस लेखाधिकारी राजेंद्र एडके यांनी मार्गदर्शन केले.पोखरा योजनेत सामाविष्ट गावातील लाभार्थीला आता शासकीय कार्यालयात चकरा मारण्याची गरज नाही. पोखरा योजनेचा लाभ घेण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीला गठित करण्यात आलेल्या समितीला आधिकार दिले आहेत. त्यामुळे निवडलेले लाभार्थीला संबंधित योजनेतील साहित्य खरेदी करून त्याची बिले सादर करताच लाभार्थीला त्याच्या खात्यावर पैसे जमा केली जातात. समितीची दर महिन्याला बैठक घेण्यात येते. त्यात ज्या शेतकरी लाभार्थींनी अर्ज सादर केला आहे त्या लाभार्थीला पूर्वसंमती दिली जाते. त्या लाभार्थीचे नाव आॅनलाईन करून निवड केली जाते.-मधुकर दौलतराव पाटील, सरपंच, तारखेडा खुर्द, ता. पाचोरा