शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्हा रुग्णालयातील हाणामारी प्रकरणात पाच जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 21:43 IST

 पोलीस बॉईज व शनी पेठ पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात राहणा-या तरुणांच्या दोन गटात रविवारी दुपारी जोरदार हाणामारी झाली. या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर शनी पेठ हद्दीतील पाच तरुणांना जिल्हा रुग्णालयात दोन तरुणांवर झालेल्या हल्लयाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. या प्रकरणात आणखी आरोपी वाढणार असल्याची शक्यता पोलीस अधिका-यांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देपोलीस अधीक्षक कार्यालयासमोर केली होती हाणामारीदुस-या गुन्ह्यात केले वर्गपाचही जणांना तीन दिवसाची पोलीस कोठडी

आॅनलाईन लोकमतजळगावदि,२६ :  पोलीस बॉईज व शनी पेठ पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात राहणा-या तरुणांच्या दोन गटात रविवारी दुपारी जोरदार हाणामारी झाली.  या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर शनी पेठ हद्दीतील पाच तरुणांना जिल्हा रुग्णालयात दोन तरुणांवर झालेल्या हल्लयाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. या प्रकरणात आणखी आरोपी वाढणार असल्याची शक्यता पोलीस अधिका-यांनी व्यक्त केली आहे.पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर रविवारी दुपारी तरुणांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती त्यात शनी पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चंद्रशेखर सदाशिव कोळी , राहूल रतिलाल सपकाळे, पंकज हरी तायडे व सुदर्शन भिका कोळी रा.पाळधी, ता.धरणगाव तर दुस-या गटातील पोलीस बॉईज निलेश सोपान पाटील (रा.शामराव नगर, आशाबाबा नगर, जळगाव), मोंटू अभिमन्यू इंगळे (रा. पोलीस लाईन दक्षता नगर, जळगाव), राजेश नथ्थू शिंदे (रा.आसोदा, ता.जळगाव), पुष्पक मुकेश पाटील (रा.पोलीस लाईन, दक्षता नगर, जळगाव) या ९ जणांविरुध्द जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात झाला होता. हा गुन्हा जामीनपात्र असल्याने सर्व  ९ जणांना जामीन झाला.

यांना घेतले दुसºया गुन्ह्यात ताब्यातराहूल रतिलाल सपकाळे (वय २१ रा.वाल्मिक नगर, जळगाव), चंद्रशेखर सदाशिव कोळी (वय २३, रा.कांचन नगर, जळगाव), पंकज हरी तायडे (वय २१ रा.कांचन नगर, जळगाव), सुदर्शन भिकन सौदाने (वय १९ रा.कांचन नगर, जळगाव) व समीर अरीफ शाह (वय २० रा.पाळधी, ता.जळगाव) या पाच जणांना दुस-या गुन्ह्यात वर्ग करण्यात आले. शेख सलमान शेख मेहबूब (वय १९ रा.तांबापुरा, जळगाव) या तरुणाला ३१ डिसेंबर २०१७ रोजी जिल्हा रुग्णालयात मारहाण झाली होती. या सर्वांना न्यायालयाने २८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे अ‍ॅड.आशा शर्मा यांनी काम पाहिले.