शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
3
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास
4
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
5
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
6
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
7
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
8
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
9
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
10
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
11
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
12
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
13
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
14
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
15
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
16
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
17
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
18
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
19
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
20
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
Daily Top 2Weekly Top 5

एसटी बसचालकाच्या खूनप्रकरणी पाच आरोपींना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 17:37 IST

वरणगाव येथे ट्रॅक्टरला कट लागल्याच्या कारणावरून मेहकर आगाराच्या बसचालकाला बेदम मारहाण करून खून केल्याप्रकरणी पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रशांत सित्रे यांनी मंगळवारी हा निकाल दिला.

ठळक मुद्देभुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचा निकालवरणगाव येथे घडली होती घटनामयत चालक मेहकर तालुक्यातील रहिवासी

भुसावळ, जि.जळगाव : वरणगाव येथे ट्रॅक्टरला कट लागल्याच्या कारणावरून मेहकर आगाराच्या बसचालकाला बेदम मारहाण करून खून केल्याप्रकरणी पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रशांत सित्रे यांनी मंगळवारी हा निकाल दिला. त्यामुळे वरणगावसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मेहकर आगाराची बस (क्रमांक एमएच-४०-एन-८७९२) ही जळगाव ते लोणार जात होती. या बसचा फुलगाव फाट्याजवळ भुईमुगाचा पाला घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला कट लागला, असा आरोप करून ट्रॅक्टरवरील समाधान भास्कर कोळी रा.अंजनसोडा, प्रमोद इंगळे रा.ओझरखेड, सुरेश देवराम पाटील रा.ओझरखेड, संदीप उर्फ मनू रामा इंगळे रा.ओझरखेड व जयेश सारंगधर पंडित पाटील रा.साकेगाव यांनी एस.टी.बसला वरणगाव येथील देशमुख पेट्रोल पंपाजवळ ओव्हरटेक करून बस थांबवली. यानंतर बसचालक प्रकाश नारायण मस्के (वय ४०) रा.प्रतापपूर, ता.मेहकर, जि.बुलढाणा यांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी बसवाहक वैभव माणिकराव शिरसाट यांनी वरणगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. यावरून या पाच जणांविरुद्ध गु.र.नं. ५७/११, भा.दं.वि. कलम ३३२, ३५३, ३४१, ३२३, ५०४, ५०६ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. १२ जून २०११ मध्ये ही घटना घडली होती.मात्र उपचारादरम्यान चालक प्रकाश मस्के यांचा मृत्यू झाला. त्यामुळे वरणगाव पोलीस स्टेशनला या कलमांमध्ये पुन्हा ३०२ कलम वाढवण्यात आले. तपास एपीआय पाचोरकर यांनी केला होता.यासंदर्भात नऊ साक्षीदार तपासण्यात आले, तर डॉ.पंकज सैदाणे यांनी शवविच्छेदन केले होते. आरोपींविरुद्ध साक्षीदार महत्त्वपूर्ण ठरले. त्यामुळे या पाचही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. सरकारतर्फे अ‍ॅड.प्रवीण पी. भोंबे, मुक्ताईनगर यांनी कामकाज पाहिले. आरोपींतर्फे अ‍ॅड.सागर चित्रे, अ‍ॅड.मोझ, अ‍ॅड.प्रफुल्ल पाटील, अ‍ॅड.कैलास लोखंडे यांनी युक्तिवाद केला. पैरवी अधिकारी म्हणून शहर पोलीस ठाण्याच्या पो.हे.कॉ.समीना तडवी यांनी मदत केली.

टॅग्स :Courtन्यायालयBhusawalभुसावळ