शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

पाच कोटींचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 23:10 IST

पाचोरा तालुका : विविध योजनांचा लाभ

पाचोरा : केंद्र व राज्य सरकार मार्फत राबविण्यात येत असलेल्या निराधार योजनेअंतर्गत पाचोरा तालुक्यात जून अखेर पर्यंत ४ कोटी ९७ लाख ३५ हजार तीनशे रुपये अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे.तालुक्यात विविध प्रकारच्या योजनेतील एकूण १९ हजार ५०७ लाभार्थी आहेत. यात श्रावण बाळ योजना ८ हजार ४४६, संजय गांधी निराधार योजना ५ हजार ४१, संजय गांधी विधवा निराधार ४८५, संजय गांधी अपंग २६, इंदिरा गांधी निराधार योजना ४हजार ९९८, इंदिरा गांधी विधवा निराधार-४८५, इंदिरा गांधी अपंग निराधार-२६ असे पात्र लाभार्थी आहेत.या लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात एप्रिल, मे, जून ह्या तीन महिन्याचे पूर्ण अनुदान एकूण ४ कोटी ९७ लाख ३५ हजार ३०० रुपये हे पाचोरा संजय गांधी निराधार योजना कार्यालयामार्फत बँकेत जमा केले आहे.यात केंद्र शासन पुरस्कृत योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ व अपंग योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येकी एक हजार सानुग्रह अनुदान व इंदिरा गांधी विधवा पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी पाचशे रुपये सानुग्रह अनुदान जास्तीचे देण्यात आले आहे.जून अखेर पर्यंत पूर्ण अनुदान निराधारांना देण्यात आल्याची माहिती तहसीलदार कैलास चावडे तसेच संगानियो नायब तहसीलदार बी. डी. पाटील यांनी दिली. अव्वल कारकून बी. पी. नेटके, आर. एस. साळुंखे, एस. पी. पाटील यांनी कामकाज पाहिले.दरम्यान अद्यापही खरे पात्र लाभार्थी योजनांपासून वंचितच असून यापूर्वी बनावट व दिशाभूल करून निराधार म्हणून मंजुरी मिळाल्याने अनेक अपात्र लाभार्थींही पात्र होऊन या योजनांचा लाभ घेत असल्याचे दिसून येत आहे.मात्र खऱ्या गरजूंना लाभ मिळत नसून त्यांना लाभ मिळऊन द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात यावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.