शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

पाच अंगणवाडय़ा बंदावस्थेतच

By admin | Updated: January 9, 2017 00:47 IST

अडावद : दीड वर्षापासून बांधकाम पूर्ण, हस्तांतरणाची प्रक्रिया रखडली

अडावद : येथे जिल्हा परिषदेने शासनाच्या मानव विकास कार्यक्रमांतर्गत  पाच अंगणवाडय़ांचे बांधकाम केले. यासाठी शासनाचा सुमारे 30 लाख रुपयांचा निधी खर्च झाला. अंगणवाडय़ांच्या नवीन खोल्यांचे बांधकाम होऊन दीडवर्ष झाले. मात्र त्यांचे हस्तांतरण रखडल्याने, या अंगणवाडय़ा धूळखात बंद पडल्या आहेत. परिणामी आजही काही अंगणवाडय़ा उघडय़ावर भरत आहे.येथे शासनाच्या महिला, बालविकास प्रकल्पांतर्गत 27 नियमित तर दोन मिनी अंगणवाडय़ा  सुरू असतात. दिवसेंदिवस गावाचा विस्तार होत असल्याने सोयीनुसार ठिकठिकाणी अंगणवाडी भरते. त्यासाठी त्या, त्या परिसरातील अंगणवाडी सेविका, मदतनीस अंगणवाडी चालवित असतात. यात प्रामुख्याने 17 इमारती अंगणवाडय़ांसाठी उपलब्ध असून तेथे 17 अंगणवाडय़ा भरतात. सात अंगणवाडय़ा भाडे तत्त्वावर घेतलेल्या इमारतीत भरतात. तीन अंगणवाडय़ा  टपरीच्या ठिकाणी तर एक सध्या पाणीपुरवठा कामासाठी असलेल्या खोलीत भरते. एक अंगणवाडी व्हरंडय़ात भरते, अशा सुमारे 29 अंगणवाडय़ा येथे भरतात.येथे जि.प.माध्यमातून  मानव विकास कार्यक्रमांतर्गत (सन 2013-14) प्रत्येकी सहा लाख रुपयाप्रमाणे पाच अंगणवाडय़ांचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यात आनंदनगर, लोखंडे नगर, संभाजीनगर, वनादाजीनगर,  प्रमिलानगर याठिकाणांचा समावेश आहे. परंतु बांधकाम होऊन सुमारे दीड वर्षे उलटले तरी अद्याप या अंगणवाडय़ा ग्रामपंचायतीच्या ताब्यात मिळाल्या नाही. त्या   बंद अवस्थेतच पडल्या आहेत. काही ठिकाणी या नव्याने बांधण्यात आलेल्या अंगणवाडय़ाच्या खिडक्या नादुरुस्त होऊ लागल्या आहेत. तसेच बांधकामाचेही नुकसान होत आहे. परंतु कुणीही याकडे लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे.या अंगणवाडय़ा सुरू व्हाव्या. यासाठी ग्रामस्थांनी दोनवेळा ग्रामसभेत हा विषय लावून धरला. परंतु काहीही निष्पन्न झाले नाही. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.            (वार्ताहर)अंगणवाडय़ातून घेतात 3211 विद्यार्थी शिक्षण  या अंगणवाडय़ांच्या माध्यमातून 0 ते 3 वयोगटातील  विद्याथ्र्याना पोषण आहार व आरोग्याच्या सुविधा पुरविणे तसेच तीन ते सहा वर्ष वयोगटातील विद्याथ्र्याना शिक्षण, पोषण आहार देण्याचे काम सुरू असते. तब्बल 3211 विद्याथ्र्याना  अंगणवाडय़ांच्या माध्यमाने शिक्षण मिळते.अंगणवाडय़ांचे बांधकाम होऊन तब्बल दीड वर्षे झाले तरी त्या उघडण्यात आलेल्या नाहीत. याकडे सर्वाचे दुर्लक्ष झालेले आहे.अंगणवाडय़ांचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. हस्तांतरणाबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. परंतु ठेकेदार आजारी असल्याने उशीर झाला. परंतु लवकरच हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करून घेऊ.- जयश्री पाटील, जि.प.सदस्या, अडावदसंबंधित ठेकेदाराला वेळोवेळी सूचना देऊन अंगणवाडय़ा हस्तांतरण करण्याचे  सांगितले. परंतु हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण केली नाही.- प्रदीप धनगर, ग्रामविकास अधिकारी, अडावद