शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेर येथील तलाठ्यावर हल्ला प्रकरणात पाच आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 23:25 IST

 अमळनेर तालुक्यातील आंचलवाडी ते रणाईचे रस्त्यावर तलाठी योगेश रमेश पाटील यांच्यावर हल्ला करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात शीतल सुखदेव देशमुख, योगीराज डिगंबर चव्हाण, उमेश उत्तम वाल्हे, श्रीकांत उर्फ प्रदीप विठ्ठल पाटील व शिरीष पाटील (सर्व रा.अमळनेर) या पाच आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज सोमवारी अमळनेर न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

ठळक मुद्दे१७ जानेवारी रोजी घडली होती घटनापाचही आरोपी फरारतलाठ्यांनी पुकारले काम बंद आंदोलन

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,५:  अमळनेर तालुक्यातील आंचलवाडी ते रणाईचे रस्त्यावर तलाठी योगेश रमेश पाटील यांच्यावर हल्ला करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात शीतल सुखदेव देशमुख, योगीराज डिगंबर चव्हाण, उमेश उत्तम वाल्हे, श्रीकांत उर्फ प्रदीप विठ्ठल पाटील व शिरीष पाटील (सर्व रा.अमळनेर) या पाच आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज सोमवारी अमळनेर न्यायालयाने फेटाळून लावला आहे.अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गस्तीवर असलेल्या महसूल विभागाच्या पथकातील तलाठी योगेश पाटील यांच्यावर १७ जानेवारी रोजी रात्री ९ जणांना हल्ला करुन बेदम मारहाण केली होती. या हल्लेखोरांच्या तावडीतून जीव वाचवत पळत सुटलेल्या पाटील यांना प्रांताधिका-यांनीच रस्त्यावर मदत केली होती. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, आरोपींना अटक होत नसल्याने जिल्हाभरातील तलाठ्यांनी काम बंद आंदोलन छेडले. स्वत: जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर व पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी या प्रकरणात लक्ष घातल्याने काही आरोपींना अटक झाली, मात्र मुख्य आरोपींना अद्यापही अटक झालेली नाही. अशा स्थितीत त्यांनी अमळनेर न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर सोमवारी कामकाज होऊन हा अर्ज फेटाळण्यात आला. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी स्वत: सरकार पक्षाची बाजू मांडून जामीनास विरोध दर्शविला.