शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात सायटोमेगालो विषाणूचा पहिला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:18 IST

जळगाव : जळगाव जिल्ह्यात सायटोमेगालो व्हायरसचा पहिला बळी गेला आहे. अमळनेरच्या नितीन नंदलाल परदेशी (३३) या तरुणाला कोरोनानंतर सायटोमेगालो ...

जळगाव : जळगाव जिल्ह्यात सायटोमेगालो व्हायरसचा पहिला बळी गेला आहे. अमळनेरच्या नितीन नंदलाल परदेशी (३३) या तरुणाला कोरोनानंतर सायटोमेगालो या व्हायरसची लागण झाली होती. त्यानंतर त्याचा २४ रोजी रात्री मृत्यू झाला. पोस्ट कोरोनात सायटोमेगालो व्हायरसची लागण होऊन दगावलेला बहुधा पहिलाच रुग्ण असावा.

अमळनेरच्या नितीन परदेशी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांनी कोरोनाचे उपचार अमळनेरमध्येच घेतले. त्यानंतर ते घरी गेले. त्यांना पुन्हा ताप आला. त्यानंतर ऑक्सिजनची पातळी खालावली. त्यानंतर त्यांना जळगावच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तरीही प्रकृती खालावत असल्याने तसेच व्हेंटिलेटरची गरज भासत असल्याने डॉ. नीलेश किनगे यांच्या ॲक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर २५ दिवस उपचार करण्यात आले. अखेर सोमवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. पोस्ट कोरोनाच्या अडचणींमध्ये सायटोमेगालो व्हायरसने दगावलेला हा बहुधा पहिलाच रुग्ण असावा.

गेल्या काही दिवसांपासून नितीन परदेशी यांची ऑक्सिजन पातळी घसरत होती. त्यातच त्यांच्या एका डोळ्याची दृष्टी गेली. त्यानंतर त्याला सायटोमेगालो व्हायरसशी संबंधित औषधी देण्यात येऊ लागली. मात्र, प्रकृती बिघडतच गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.

सायटोमेगालो हा नवीन विषाणू नाही. मात्र, कोरोनातून बरे झाल्यानंतर अनेकांची रोग प्रतिकारशक्ती खूपच कमी होते, अशा काळात रुग्णांना या विषाणूची लागण होण्याची शक्यता असते.

===Photopath===

260521\26jal_5_26052021_12.jpg

===Caption===

नितीन नंदलाल परदेशी