शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातील पहिली उचंदा ग्रामपंचायत झाली पेपरलेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 00:39 IST

सर्व नोंदी व दाखले मिळणार आॅनलाइन

ठळक मुद्देउचंदे गावाला प्रथमच मानयापुढे सर्व नोंदी व दाखले ग्रामस्थांना आॅनलाइन पारदर्शक व स्वच्छ होणारअधिकारी व पदाधिकाºयांनी केले अभिनंदन

उचंदा, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदे गावाने जळगाव जिल्ह्यातील पहिली पेपरलेस ग्रामपंचायत होण्याचा बहुमान पटकाविला आहे. यापुढे सर्व नोंदी व दाखले ग्रामस्थांना आॅनलाईन पारदर्शक व स्वच्छ होणार आहे.ग्रामस्थांना जलद व गतिमान सेवा मिळणार असल्याने लोकांना वेळ व श्रम वाचणार असल्याची माहिती ग्रामसेवक एकनाथ कोळी यांनी दिली. ग्रा.पं.पेपरलेस होण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.), बी.ए.बोटे, बीडीओ डी.आर.लोखंडे, आपले सरकार सेवा केंद्र जिल्हा समन्वयक किशोर धोटे, तालुका समन्वयक नरेंद्र ठाकरे, विस्तार अधिकारी बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रा.पं.संगणक परिचालक योगेश पाटील, ग्रामसेवक एकनाथ कोळी, साहेबराव पाटील व सरपंच शशिकला पाटील यांच्या सहकार्याने सर्व दप्तर आॅनलाईन केले आहे.उचंदा ग्रा.पं. जिल्ह्यात पहिली पेपरलेस ग्रा.पं.झाली आहे. ग्रामस्थांना एक ते ३३ प्रकारचे विविध नोंद व दाखले हे आता आॅनलाईन मिळणार आहे. त्यामध्ये रहिवासी, जन्म-मृत्यू व ८ अ असे विविध दाखल्यांचा समावेश आहे. यासाठी प्रत्येक संगणकीकृत दाखल्यांसाठी २० रुपये शुल्क आकारले जाईल. दोन मिनिटात ग्रामस्थांना दाखला मिळेल. हे शुल्क ग्रा.पं.फंडात जमा करणार असल्याचे ग्रामसेवक एकनाथ कोळी यांनी सांगितले.उचंदे गावाला आतापर्यंत कोणताच बहुमान मिळाला नव्हता. नेहमी विकास कामात पीछाडीवर असणाऱ्या उचंदा ग्रा.पं.ला पेपरलेस होण्याचा जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळाल्याने गावाची शान वाढली आहे. उचंदे गावासाठी हा एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. उचंदा गावाला पेपरलेस होण्याचा मान मिळाल्याबद्दल पं.स.सभापती शुभांगी भोलाणे, बीडीओ डी.आर.लोखंडे, सर्व पं.स.सदस्य, सरपंच शशिकला पाटील व सर्व सदस्यांनी व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतMuktainagarमुक्ताईनगर