शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पहिल्यांदाच पाठ्यपुस्तकातील लेखक-कवी एकाच व्यासपीठावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 17:33 IST

भुसावळ , जि.जळगाव : कोरोना जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम ...

ठळक मुद्देदहावीच्या १५, तर बारावीच्या पाच ऑनलाईन संवाद सत्राचा महाराष्ट्रातील हजारो शिक्षकांनी घेतला लाभलॉकडाउनचा घेतला सदुपयोग

भुसावळ, जि.जळगाव : कोरोना जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ तथा बालभारती येथील मराठी भाषा अभ्यास गट सदस्य डॉ.जगदीश पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित उपक्रमांतर्गत दहावी-बारावी पाठ्यपुस्तकातील लेखक-कवींशी ऑनलाईन संवाद साधण्यात आला. त्यामुळे राज्यात पहिल्यांदाच पाठ्यपुस्तकातील लेखक-कवी एकाच व्यासपीठावर आले.आपल्या पाठ्यपुस्तकातील लेखक-कवींना पाहण्याचे व ऐकण्याचे आकर्षण प्रत्येक शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये असते. हेच आकर्षण पूर्ण करण्यासाठी डॉ.जगदीश पाटील यांनी पाठ्यपुस्तकातील लेखक-कवी यांच्याशी ऑनलाईन संवाद असा उपक्रम राबवला. याअंतर्गत प्रारंभी दहावी मराठी कुमारभारती पाठ्यपुस्तकातील लेखक-कवींशी ऑनलाईन संवाद साधण्यात आला. डॉ.सुनील विभुते (निर्णय), डॉ.महेंद्र कदम (आजी : कुटुंबाचं आगळ), ज.वि. पवार (तू झालास मूक समाजाचा नायक), वीरा राठोड (मनक्या पेरेन लागा), डॉ.नीलिमा गुंडी (बोलतो मराठी...), डॉ.शिरीष गोपाळ देशपांडे (कर्ते सुधारक कर्वे), आसावरी काकडे (खोद आणखी थोडेसे), डॉ.विजया वाड (बालसाहित्यिका : गिरिजा कीर), अरविंद जगताप (आप्पांचे पत्र), नीरजा (आश्वासक चित्र), द.भा. धामणस्कर (वस्तू), सुप्रिया खोत (गोष्ट अरूणिमाची) अशा बारा लेखक-कवींसह डॉ. दिपाली पूर्णपात्रे (सोनाली पाठातील पात्र), हभप चारूदत्त आफळे महाराज (संत रामदास यांच्या उत्तम लक्षण काव्यावर निरूपण) आणि बालभारतीच्या मराठी विशेषाधिकारी सविता वायळ यांनी समारोपीय संवाद साधला.अशा पद्धतीने दहावीची पंधरा ऑनलाईन संवाद सत्र पार पडली.याच धर्तीवर बारावी मराठी युवकभारती पाठ्यपुस्तकातील लेखक-कवींशी ऑनलाईन संवाद साधण्यात आला.हिरा बनसोडे (आरशातली स्त्री), डॉ. प्रतिमा इंगोले (गढी), कल्पना दुधाळ (रोज मातीत), अनुराधा प्रभुदेसाई (वीरांना सलामी) अशा चार लेखक-कवींनी शिक्षकांशी संवाद साधला. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारतीचे संचालक विवेक गोसावी यांनी पाठ्यपुस्तक निर्मिती व वितरणाची वाटचाल यासंदर्भात शिक्षकांशी ऑनलाईन संवाद साधून सत्राचा समारोप केला. अशा पद्धतीने बारावीची पाच ऑनलाईन संवाद सत्र पार पडली. राज्यात पहिल्यांदाच दहावी-बारावी पाठ्यपुस्तकातील लेखक-कवींशी ऑनलाईन संवाद या उपक्रमांतर्गत वीस संवाद सत्रे पार पडून पाठ्यपुस्तकातील लेखक-कवी एकाच व्यासपीठावर आणण्याची किमया मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ.पाटील यांनी साधली. या उपक्रमाला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. ऑनलाईन संवाद सत्रात सहभागी झालेल्या लेखक-कवींच्या सर्व ऑनलाईन सत्रांचे रेकॉर्डिंग युट्युबवर अपलोड करून सर्वांसाठी खुले करून दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :marathiमराठीBhusawalभुसावळ