शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

जिल्ह्यात प्रथमच ‘स्कुबा डायव्हिंग’चा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 21:23 IST

मान्सूनपूर्व आढावा बैठक

ठळक मुद्देआपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन नाले-गटारींची साफसफाई आवश्यक

जळगाव : यंदा पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूरपरिस्थितीशी मुकाबला करताना शोधकार्यासाठी जिल्ह्यात प्रथमच ‘स्कुबा डायव्हींग’चा वापर करण्यात येणार आहे. त्याचे प्रात्यक्षिक गुरूवारी दुपारी नियोजन भवन येथे आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठकीत केले. आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सर्व संबंधीत यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय साधून सज्ज राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी यावेळी केले.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे आयोजित या बैठकीस व्यासपीठावर अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडिलकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एन. पी. रावळ उपस्थित होते.नाले-गटारींची साफसफाई आवश्यकजिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, आपत्तीजन्य परिस्थितीत उपलब्ध असलेल्या साधनांचा उपयोग करताना त्या साधनांचा वापर यंत्रणेतील कर्मचाºयांना करता आला पाहिजे. यासाठी त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण दिल्यास जिवीतहानी टाळण्यास मदत होते. मान्सुनपूर्व तयारीचा आढावा घेताना पावसाळ्यापूर्वी महानगरपालिका व नगरपालिका भागातील गटारींची साफसफाई होणे आवश्यक आहे.विद्युत तारांजवळील झाडांच्या फांद्या तोडणे, पूरपरिस्थितीच्या काळात शालेय विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी. तसेच त्यांना नदी, नाले ओलांडू देवू नये.वाहने पूराच्या पाण्यातून नेऊ देवू नये. साथीचे रोग टाळण्यासाठी आरोग्य विभागाने आरोग्य केद्रांच्या ठिकाणी पुरेसे औषधे उपलब्ध ठेवण्याबरोबरच आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात.तसेच ज्या गावांना पुराच्या पाण्याचा विळखा पडतो तसेच जे रस्ते पुराच्या पाण्याखाली येतात. त्यांची माहिती सर्व संबंधित यंत्रणेने घेऊन ठेवावी व त्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना आखण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्यात.या बैठकीस जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांचेसह जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, होमगार्ड, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.स्कुबा डायव्हिंगचे तीन सेटयावेळी महानगरपालिका, जिल्हा परिषद, होमगार्ड, जलसंपदा विभाग यांनी आपत्ती व्यवस्थापनाबाबत केलेल्या आराखड्याचे सादरीकरण केले. आपत्तीजन्य परिस्थितीत खोल पाण्यात बुडालेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्कुबा डायव्हिंगचे तीन सेट घेण्याचे आले असून या सेटच्या वापराचे प्रात्याक्षिक दाखविण्यात आले. तसेच भविष्यात जिल्ह्यात कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवल्यास त्यासाठी प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या तयारीची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एन. पी. रावळ यांनी दिली.