शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

४५ वर्षात प्रथमच आकाशवाणीचे प्रक्षेपण केंद्र बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:13 IST

जळगाव : ‘नमस्कार श्रोते हो...’ अशा मंजुळ आवाजाने जळगाव आकाशवाणी केंद्र खान्देशवासीयांना भल्या पहाटे जागविते. दिवसाची सुरुवात ‘विचारपुष्प’ने करते. ...

जळगाव : ‘नमस्कार श्रोते हो...’ अशा मंजुळ आवाजाने जळगाव आकाशवाणी केंद्र खान्देशवासीयांना भल्या पहाटे जागविते. दिवसाची सुरुवात ‘विचारपुष्प’ने करते. ज्यामुळे लाखो श्रोत्यांचा दिवस आनंदाने जात असताना चार दिवसांपूर्वी शिरसोली येथील जळगाव आकाशवाणी प्रक्षेपण केंद्राच्या इमारतीला लागलेल्या आगीत केंद्रातील अनेक उपकरणे जळून खाक झाली आहेत. त्यामुळे चार दिवसांपासून हे प्रक्षेपण केंद्र बंद पडले आहे. विशेष म्हणजे आकाश‌वाणीच्या ४५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यादांच असा प्रकार घडला आहे.

गेल्या चार दिवसांपूर्वी आकाशवाणीच्या शिरसोली येथील प्रक्षेपण केंद्राला लागलेल्या आगीत प्रक्षेपणाची विविध उपकरणे, संगणक रूम व इतर अनेक तांत्रिक साहित्य जळाले. गेल्या ४५ वर्षांत ऊन, वारा, वादळ किंवा कुठलीही नैसर्गिक आपत्ती असो, कधीही आकाशवाणी केंद्रावरच एकही कार्यक्रम किंवा प्रक्षेपण केंद्र बंद पडले नसल्याचे सांगण्यात आले.

इन्फो :

अन् लाखो श्रोत्यांच्या मनोरंजनावर विरजण

जळगाव आकाशवाणी केंद्राचे जळगाव जिल्ह्यासह धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यातही प्रक्षेपण असते. सकाळच्या विचारपुष्प या कार्यक्रमानंतर राज्य शासनाचा दिलखुलास कार्यक्रम, त्यानंतर चित्रगीत, ‘झुबंर’ कौटुंबिक मालिका, शेतीजगत, संगीत रंजनी, चित्रगीत, युवावाणी अशा प्रकारच्या विविध कार्यक्रमांची मेजवानी आकाशवाणी केंद्रावरून सुरू असते. इतकेच नाही तर सकाळ, दुपार आणि संध्याकाळी मराठी व हिंदीतून बातम्या लागत असल्यामुळे, आजही खान्देशात आकाशवाणी केंद्राचे स्थान कायम टिकून आहे. मात्र, एका आगीच्या घटनेमुळे पहिल्यादांच हे केंद्र बंद पडल्यामुळे श्रोत्यांना त्यांचा दिनक्रमही चुकल्यासारखा वाटत आहे.

इन्फो :

प्रक्षेपण पुन्हा सुरू करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न

चार दिवसांपासून बंद असलेल्या आकाशवाणी केंद्राच्या प्रक्षेपणाबाबत ‘लोकमत’ प्रतिनिधीने येथील प्रक्षेपण अधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनी पुन्हा आकाशवाणीचे प्रक्षेपण सुरू करण्यासाठी बाहेरून तांत्रिक कर्मचाऱ्यांची टीम आली आहे. ही टीम युद्ध पातळीवर काम करत आहे. त्यामुळे लवकरच हे प्रक्षेपण केंद्र सुरू होणार असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले.