शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

एरंडोल तालुक्यातील पहिली पिंप्री प्र.चां. ग्रामपंचायत झाली पेपरलेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 18:22 IST

अधिकृत घोषणेद्वारे जाहीर

ठळक मुद्देसर्व ग्राम पंचायती पेपरलेस करण्याच्या सूचनाकामगिरीबद्दल पदाधिकाऱ्यांचा प्रशासनातर्फे सत्कार

एरंडोल, जि.जळगाव : तालुक्यातील पिंप्री प्र.चां. ग्रामपंचायतीचा पूर्ण कारभार आॅनलाइन झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. आपले सरकार सेवा केंद्र पिंप्री प्र.चा या ग्रामपंचायतीमधील एक ते ३३ नमुने पूर्ण आॅनलाइन करून ही ग्राम पंचायत पेपरलेस म्हणून घोषित करण्यात आली आहे. १२ सप्टेंबर २०१८ रोजी ही ग्रा.पं. पेपरलेस करण्यात आली.पिंप्री प्र.चां. ग्राम पंचायतीने पेपरलेस ग्रामपंचायत म्हणून जिल्ह्यातील दुसरी ग्रामपंचायत व तालुक्यातील पहिलीच ग्रामपंचायत म्हणून मान मिळविला आहे.सर्व दस्तावेज आॅनलाइन पद्धतीने मिळतील व त्यामुळे वेळेची बचत होईल. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत (५१ ग्रा.पं.) पेपरलेस करण्याबाबत सूचना गटविकास अधिकारी स्नेहा कुडचे (पवार) यांनी दिल्या आहेत.१४ रोजी एरंडोल पंचायत समितीतर्फ पिंप्री प्र.चा.ग्रामपंचायतीच्या सरपंच विद्या विशाल पाटील, उपसरपंच पांडुरंग नामदेव पाटील व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.याकामी आपले सरकार सेवा केंद्राचे तालुका व्यवस्थापक कल्पेश शिरोडे यांचे सहकार्य लाभले. तसेच गटविकास अधिकारी स्नेहा कुडचे (पवार), विस्ताराधिकारी डी.बी.सुरवाडे, अडागळे, जिल्हा व्यवस्थापक किशोर यांचेही मार्गदर्शन मिळाले.सदर ग्राम पंचायत पेपरलेस करण्यासाठी स्थानिक केंद्र चालक सूर्यकांत पाटील यांनी परिश्रम घेतले. ग्रामसेवक मिलिंद पाटील यांनी त्यांना मदत केली.