शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

भाजपा उमेदवारांची बुधवारी पहिली यादी

By admin | Updated: January 21, 2017 00:18 IST

45 जागांवर विजयाचा संकल्प करून उमेदवारांची पहिली यादी बुधवार, 25 रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जळगाव : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तयारी संदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कोअर कमिटीची बैठक शुक्रवारी दुपारी 1 वाजता भाजपा कार्यालयात झाली. या बैठकीत 45 जागांवर विजयाचा संकल्प करून उमेदवारांची पहिली यादी बुधवार, 25 रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली.बैठकीस जलसंपदामंत्री गिरीश महाजन, जि.प. अध्यक्षा प्रयाग कोळी, खासदार ए.टी.पाटील, आमदार हरिभाऊ जावळे,  आमदार संजय सावकारे, आमदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार चंदुलाल पटेल, आमदार उन्मेष पाटील, विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर, प्रा.सुनील नेवे उपस्थित होते.निवडणूक खडसे व महाजन यांच्या नेतृत्त्वाखालीजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही माजी मंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच 67 पैकी 45 जागांवर विजयी होण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. भाजपाकडून विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक लढविण्यात येणार असून जिल्ह्यातील 1167 उमेदवारांची नावे पक्षाकडे प्राप्त झालेली असल्याचे त्यांनी सांगितले.भाजपाची निवडणुकीची तयारी पूर्णगुरुवारी रावेर लोकसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण झाल्या आहेत. तर शनिवारी जळगाव लोकसभा क्षेत्रातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहे. मुलाखतीसाठी सव्रेक्षणाचा अहवाल समोर ठेवून उमेदवाराचे चारित्र्य, राजकारणासोबत समाजकारण, जनसंपर्क, निवडून येण्याची क्षमता तपासून उमेदवार निश्चिती करणार आहे. 15 तालुका मेळावे तसेच 67 पैकी 63 जि.प.गटाचे मेळावे पूर्ण झाले आहे. 23 जानेवारीर्पयत गटाचे सर्व मेळावे पूर्ण होतील, असे त्यांनी सांगितले.भाजपाच्या वॉर रूममार्फत प्रत्येक मतदारार्पयत संपर्कभाजपा कार्यालयात तयार केलेल्या वॉर रूमच्या माध्यमातून प्रत्येक मतदारासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न राहणार आहे. तसेच जिल्ह्यातील साडेपाच लाख मतदारांसोबत या वॉर रूमच्या माध्यमातून संवाद साधण्यात येणार आहे. तसेच पहिल्या टप्प्यात बुथ समिती तसेच गट व गणातील कार्यकत्र्यासोबत चर्चा करून परिस्थिती जाणून घेण्यात येणार           आहे. त्यानुसार निवडणुकीचे नियोजन करण्यात येणार आहे.निवडणूक संचलन समिती नियुक्तजि.प.निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर निवडणूक संचलन समिती तयार केली आहे. त्यात बुथ रचना पाहण्यासाठी प्रा.सुनील नेवे, प्रचार व प्रसिद्धीसाठी गणेश माळी, सदाशिव पाटील, सोशल मीडियासाठी अमित चौधरी, सचिन नवागडे, आचारसंहिता समितीवर अॅड.सत्यजित पाटील, जाहीरनामा समिती प्रमुख महेश पाटील, समन्वयकपदी गोविंद अग्रवाल व शिरीष बयस यांची नियुक्ती केली आहे. आज जळगाव लोकसभा मतदार संघातील इच्छुकांच्या मुलाखतीभाजपातर्फे शनिवार 21 रोजी जळगाव लोकसभा मतदारसंघातील जळगाव ग्रामीण, धरणगाव, एरंडोल, पारोळा, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, अमळनेर या तालुक्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजेपासून मुलाखतींना सुरुवात होणार आहे. जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यासह संसदीय समितीतील सदस्य मुलाखती घेणार आहेत.एकनाथराव खडसे आमचे नेतेजि.प.निवडणूक प्रक्रियेत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या सक्रिय सहभागाबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता, एकनाथराव खडसे हे आमचे नेते आहे. ते मुंबईत                     असल्यामुळे उमेदवारांच्या मुलाखतीला व कोअर कमिटीच्या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. निवडणूक प्रक्रियेतील निर्णय तसेच     उमेदवारांबाबत त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतले जात असल्याचे वाघ यांनी स्पष्ट केले.शिवसेनेकडून होतेय भाजपावर टीकायुतीबाबत दोन्ही वरिष्ठ नेते व जिल्हाध्यक्ष यांच्याकडून तीन वेगवेगळे वक्तव्य केले आहेत, त्याबाबत विचारले असता युतीसाठी आमची स्पष्ट भूमिका आहे. मात्र टाळी ही एका हाताने नाही तर दोन्ही हाताने वाजते. युतीचे पण तसेच आहे. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी आमदार चिमणराव पाटील हे भाजपावर विश्वासघातकी असल्याचा आरोप करीत आहेत. मात्र विश्वासघात करण्याचा प्रयत्न कुणी केला हे मतदारांना माहित असल्याचे त्यांनी सांगितले.