शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आयएमआर कॉलेजचे ‘द फोर्थ वे’ नाटक ठरले जळगाव केंद्रावर प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 22:12 IST

५७ व्या महाराष्ट राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्रथम फेरीचे निकाल सांस्कृतिक कार्य संचालनातर्फे बुधवारी जाहीर करण्यात आले. यामध्ये जळगाव केंद्रातून केसीई सोसायटीच्या आय.एम.आर.महाविद्यालयाचे ‘द फोर्थ वे’ या नाटकाला प्रथम पारितोषीक मिळाले आहे.

ठळक मुद्देराज्य नाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर दिपाली पाटील ठरली सर्वोत्कृष्ट दिग्दर्शिका‘उंच माझा झोका गं’ या नाटकास व्दितीय जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयाचे ‘ए मायनस अ’ या नाटकाला तृतीय

आॅनलाईन लोकमत

जळगाव-दि.२९-५७ व्या महाराष्ट राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्रथम फेरीचे निकाल सांस्कृतिक कार्य संचालनातर्फे बुधवारी जाहीर करण्यात आले. यामध्ये जळगाव केंद्रातून केसीई सोसायटीच्या आय.एम.आर.महाविद्यालयाचे ‘द फोर्थ वे’ या नाटकाला प्रथम पारितोषीक मिळाले आहे. तसेच या नाटकाची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.

या स्पर्धेत जवखेडे येथील समर्थ बहुउद्देशिय संस्थेचे ‘उंच माझा झोका गं’ या नाटकास व्दितीय तर डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयाचे ‘ए मायनस अ’ या नाटकाला तृतीय पारितोषिक मिळाले आहे. ६ ते २० नोव्हेंबर दरम्यान शहरातील भैय्यासाहेब गंधे सभागृहात या स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेत १४ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सुभाष भागवत, अरुण शेलार व विजय कुलकर्णी यांनी काम पाहिले. सर्व पुरस्कार विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी अभिनंदन केले आहे.

स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे१. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून ‘द फोर्थ वे’ या नाटकासाठी  दिपाली पाटील यांना प्रथम पारितोषिक मिळाले आहे. द्वितीय पारितोषिक ‘उंच माझा झोका गं’ या नाटकासाठी विशाल जाधव ला मिळाले आहे.  प्रकाश योजनेसाठी ‘द फोर्थ वे’ साठी सचिन महाजन यांना प्रथम तर ‘ए मायनस अ’ साठी चैताली क्षिरसागर ला व्दितीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.२.  नेपथ्यासाठी ‘ह्या साल्या एनर्जीचे करायचे काय’ या नाटकासाठी बाळकृष्ण तिडके यांना प्रथम तर ‘उंच माझा झोका ग’ साठी अंकुश काकडे यांना व्दितीय क्रमांक प्राप्त केला. उत्तम रंगभूषेसाठी ‘पुनरपी उ:शाप’साठी श्रध्दा कदम यांना प्रथम तर ‘जीत’साठी संजय चव्हाण यांना व्दितीय क्रमांक प्राप्त केला आहे.३. उत्कृष्ट अभिनयासाठी ‘द फोर्थ वे’ या नाटकासाठी अमरसिंह राजपुत व ‘उंच माझा झोका गं’ या नाटकासाठी अमृता भावे यांना रौप्यपदक मिळाले आहे.४. पुनम जावरे (ए मायनस अ), आरती गोळीवाले (ए मायनस अ), सरीता तायडे (साऊ), आश्विनी कोल्हे (उंच माझा झोका गं), श्रीकांत कुलकर्णी (जीत), संदीप पाचंगे (ह्या साल्या एनर्जीचे करायचे काय), पंजाबराव आखाडे (बॅलन्सशीट), अमोल ठाकुर (द फोर्थ वे) यांना अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे प्राप्त झाली आहेत.