शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नवीन वर्षाच्या मुहूर्तावर जळगावच्या नाटय़गृहात पहिला प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 13:36 IST

चंद्रकांत पाटील : बंदिस्त नाटय़गृहाचे 1 जानेवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचे नियोजन

ठळक मुद्दे शहरवासीयांना नाटकांची मेजवाणी नाटय़गृहाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 16 -  शहरवासीयांचे सुसज्ज व वातानुकुलित नाटय़गृहात नाटकाचे प्रयोग पाहण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असून  येत्या 1 जानेवारी, 2018 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांच्याहस्ते या नाटय़गृहाचे उद्घाटन करण्याचे नियोजन आहे. तसेच याचदिवशी शहरवासीयांसाठी नाटकाचा पहिला प्रयोग ठेवण्यात येणार असल्याने त्यानुसार नियोजन करून संबंधित कंत्राटदारांनी नाटय़गृहाचे काम वेळेत पूर्ण करावे. अशा सूचना महसूल,  सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. शहरवासीयांना नाटकांची मेजवाणी मिळावी यासाठी मायादेवी नगर येथे 30 कोटी रुपये खर्चाच्या व 1200 आसन व्यवस्था असलेल्या सुसज्ज आणि वातानुकुलीत नाटय़गृहाचे काम 2013 पासून सुरु आहे. या नाटय़गृहाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून आतील छताचे व विजेचे काम बाकी आहे. छतासाठी लागणारे साहित्य दुबई येथून मागविलेले आहे. ते येत्या 15 दिवसात मिळणार आहे. ते मिळाल्यानंतर आतील छताच्या कामास किमान दोन महिने कालावधी लागणार असल्याची माहिती संबंधित कंत्राटदाराने दिली.  हे काम पूर्ण झाल्यानंतर इलेक्ट्रिकल कामे पूर्ण करण्यासाठी एक महिना कालावधी  लागणार असून त्यानंतर रंगरंगोटी, व अंतर्गत सुविधांची कामे पूर्ण करण्यात येणार आहे. या सर्व कामांसाठी किमान साडेतीन ते चार महिने लागणार असल्याने ही सर्व कामे येत्या 15 डिसेंबरपयर्ंत पूर्ण होतील असे कंत्राटदारांनी सांगितले. डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशन असल्याने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच या बंदिस्त नाटय़गृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करुन त्याचदिवशी नाटकाचा पहिला प्रयोग ठेवून जळगावकरांना नवीन वर्षाची भेट देण्याची इच्छा यावेळी पालकमंत्री  पाटील यांनी व्यक्त केली. व त्यानुसार आवश्यक त्या कामांचे नियोजन करुन सर्व कामे वेळेआधी पूर्ण करण्याच्या सूचनांही त्यांनी संबंधित कंत्राटदारांना दिल्या. यावेळी पालकमंत्र्यांनी संपूर्ण नाटय़गृहाची पाहणी करुन पूर्ण झालेल्या तसेच सुरु असलेल्या कामाची माहिती घेतली.           यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, कार्यकारी अभियंता, उपअभियंता तसेच सर्व संबंधित कंत्राटदार उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यासमोर नाटय़गृहाच्या आराखडय़ाचे सादरीकरण करण्यात आले.