शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सर्वात आधी सुप्रीम कॉलनीवासियांना मिळणार ‘अमृत’चे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:18 IST

वाघुर जलवाहिनीला अमृतच्या मुख्य जलवाहिनी जोडण्याचे काम आजपासून : पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलला लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव ...

वाघुर जलवाहिनीला अमृतच्या मुख्य जलवाहिनी जोडण्याचे काम आजपासून : पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलला

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव :गेल्या तीन वर्षांपासून शहरात अमृत अंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. गुरुवारपासून अमृतची जलवाहिनी वाघुरच्या मुख्य वहिनीला जोडण्याचे काम सुरु होणार असून, अमृत अंतर्गत सर्वात आधी सुप्रीम कॉलनीवासीयांना ‘अमृत’चे पाणी मिळणार आहे. या कामांतर्गत सध्याच्या वाघूर जलवाहिनीला प्रिस्ट्स सिमेंट पाईप असून तो काढून त्याठिकाणी ५०० मिमीचा एमएस पाईप जोडला जाणार आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा एक दिवस बंद ठेवावा लागणार असून, गुरुवारी होणारा पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे.

गेल्या तीन वर्षांपासून अमृतचे काम सुरु आहे. यामुळे रस्त्यांचा खोदकामामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास देखील सहन करावा लागला होता. मात्र, आता हे काम ८० टक्के पुर्ण झाले असून, पहिल्या टप्प्यात सुप्रिम कॉलनी वासीयांना अमृतचे पाणी मिळणार आहे. सुप्रीम कॉलनीवासीय अनेक वर्षांपासून पाण्याचा समस्येपासून ग्रस्त होते. आता आठवडाभरात या भागात अमृत अंतर्गत पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती महापौर भारती सोनवणे यांनी दिली.

महापौरांनी केली पाहणी

सुप्रीम कॉलनीवासीयांना आजवर कधीही नियमित पाणीपुरवठा झालेला नसून अमृत योजनेंतर्गत परिसरासाठी नव्याने यंत्रणा बसविण्यात आली असून पाणी साठवण टाक्या तयार करण्यात आल्या आहेत. सुप्रीम कॉलनीवासीयांचा पाणीप्रश्न कायमचा मार्गी लागण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. बुधवारी महापौर भारती सोनवणे यांनी कामाची पाहणी केली. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, गणेश सोनवणे, प्रवीण कोल्हे, प्रभाग समिती सदस्य विठ्ठल पाटील, चंद्रकांत भापसे, भूषण जाधव, मनपा शहर अभियंता अरविंद भोसले, बाबा साळुंखे, योगेश बोरोले, शामकांत भांडारकर, मक्तेदार प्रतिनिधी पंकज बऱ्हाटे आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते.

आज होणार नाही पाणी पुरवठा

अमृतची जलवाहिनी वाघूरच्या जलवाहिनीला जोडण्यासाठी एक व्हॉल्व्ह बसविण्यात आला असून वाघूरच्या मुख्य वाहिनीला जोडणी करण्यास गुरुवारी सुरुवात होणार आहे. वाघूरच्या जलवाहिनीला ५०० मिमी व्यासाची लाईन जोडली जाणार असल्याने सुप्रिम कॉलनीतील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होऊ शकणार आहे. दरम्यान, या कामाळे एक दिवस पाणी पुरवठा थांबविण्यात आला असला तरी शुक्रवारपासून शहरात रोटेशननुसार सुरळीत पाणी पुरवठा होणार आहे.