शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

६ सप्टेंबरपासून आयटीआयची पहिली प्रवेश फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:21 IST

जळगाव : खाजगी, शासकीय आयटीआय प्रवेशांचे वेळापत्रक नुकतेच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. ही प्रवेश ...

जळगाव : खाजगी, शासकीय आयटीआय प्रवेशांचे वेळापत्रक नुकतेच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. ही प्रवेश प्रक्रिया शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गते केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पध्दतीने राबविण्यात येणार असून ६ सप्टेंबरपासून पहिल्या प्रवेशाची फेरी प्रारंभ होणार आहे.

प्रत्येक शासकीय व खाजगी आयटीआयमध्ये ५ जुलै ते २१ ऑगस्ट, २०२१ दरम्यान रोज सकाळी १० ते ११ या वेळेत नि:शुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. सदर सुविधेचा सर्व उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तर सर्व सुट्टी‌च्या दिवशी देखील मार्गदर्शन सत्र व प्रवेश प्रक्रिये संबंधी कार्यवाही सुरू राहणार आहे.

विद्यार्थ्यांना एकच अर्ज भरता येणार

विद्यार्थ्यांना एकच अर्ज भरता येणार आहे. एकापेक्षा अधिक अर्ज भरल्यास त्या विद्यार्थ्याचे सर्व अर्ज रद्द होतील. अशा विद्यार्थ्यांची निवड झाल्यास व चुकीने प्रवेश देण्यात आला असल्यास त्याचा प्रवेश रद्द करण्यात येणार आहे. प्रत्येक प्रवेश फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना निवड पत्र ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांनीही संपूर्ण कागदपत्र तपासणीसाठी सादर करावे. जर कागदपत्र सादर न करू शकलेल्या विद्यार्थ्याला बहाल करण्यात आलेली जागा ही रद्द करण्यात येणार आहे.

असे आहे प्रवेशांचे वेळापत्रक

- ऑनलाइन प्रवेश अर्ज करणे - १५ जुलै २०२१ ते ३१ ऑगस्ट

- पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे - १५ जुलै ते ३१ ऑगस्ट

- प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे - २ सप्टेंबर

- गुणवत्ता यादी बाबत हरकती नोंदविणे व प्रवेश अर्जातील माहितीत बदल करणे - २ ते ३ सप्टेंबर

- अंतिम गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे - ४ सप्टेंबर

- पहिल्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसायनिहाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करणे व उमेदवारांना कळविणे - ६ सप्टेंबर

- पहिल्या फेरीनुसार प्रवेश निश्चिती करणे - प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करणे - ७ ते ११ सप्टेंबर

- दुसरी प्रवेश फेरी - ७ ते १२ सप्टेंबर

- दुसरी गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे - १५ सप्टेंबर

- दुस-या यादीनुसार प्रवेश निश्चिती - १६ ते २० सप्टेंबर

- तिसर-या प्रवेश फेरीसाठी संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे - १६ ते २१ सप्टेंबर

- तिसरी गुणवत्ता यादी - २४ सप्टेंबर

- तिस-या यादीनुसार प्रवेश निश्चिती - २५ ते २८ सप्टेंबर

- चौथी फेरी - २५ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर

- चौथी गुणवत्ता यादी - ३ ऑक्टोबर

- चौथ्या यादीनुसार प्रवेश निश्चिती - ४ ते ७ ऑक्टोबर