शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

६ सप्टेंबरपासून आयटीआयची पहिली प्रवेश फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:22 IST

जळगाव : खासगी, शासकीय आयटीआय प्रवेशांचे वेळापत्रक नुकतेच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. ही प्रवेश ...

जळगाव : खासगी, शासकीय आयटीआय प्रवेशांचे वेळापत्रक नुकतेच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. ही प्रवेश प्रक्रिया शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पद्धतीने राबविण्यात येणार असून, ६ सप्टेंबरपासून पहिल्या प्रवेशाची फेरी प्रारंभ होणार आहे.

प्रत्येक शासकीय व खासगी आयटीआयमध्ये ५ जुलै ते २१ ऑगस्ट २०२१ दरम्यान रोज सकाळी १० ते ११ या वेळेत नि:शुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. सुविधेचा सर्व उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तर सर्व सुट्टी‌च्या दिवशीदेखील मार्गदर्शन सत्र व प्रवेश प्रक्रियेसंबंधी कार्यवाही सुरू राहणार आहे.

विद्यार्थ्यांना एकच अर्ज भरता येणार

विद्यार्थ्यांना एकच अर्ज भरता येणार आहे. एकापेक्षा अधिक अर्ज भरल्यास त्या विद्यार्थ्याचे सर्व अर्ज रद्द होतील. अशा विद्यार्थ्यांची निवड झाल्यास व चुकीने प्रवेश देण्यात आला असल्यास त्याचा प्रवेश रद्द करण्यात येणार आहे. प्रत्येक प्रवेश फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना निवडपत्र ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांनीही संपूर्ण कागदपत्र तपासणीसाठी सादर करावे. जर कागदपत्र सादर न करू शकलेल्या विद्यार्थ्याला बहाल करण्यात आलेली जागा ही रद्द करण्यात येणार आहे.

असे आहे प्रवेशांचे वेळापत्रक

- ऑनलाइन प्रवेश अर्ज करणे - १५ जुलै २०२१ ते ३१ ऑगस्ट

- पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे - १५ जुलै ते ३१ ऑगस्ट

- प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे - २ सप्टेंबर

- गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदविणे व प्रवेश अर्जातील माहितीत बदल करणे - २ ते ३ सप्टेंबर

- अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे - ४ सप्टेंबर

- पहिल्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसायनिहाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना कळविणे - ६ सप्टेंबर

- पहिल्या फेरीनुसार प्रवेश निश्चिती करणे - प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करणे - ७ ते ११ सप्टेंबर

- दुसरी प्रवेश फेरी - ७ ते १२ सप्टेंबर

- दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे - १५ सप्टेंबर

- दुसऱ्या यादीनुसार प्रवेश निश्चिती - १६ ते २० सप्टेंबर

- तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे - १६ ते २१ सप्टेंबर

- तिसरी गुणवत्ता यादी - २४ सप्टेंबर

- तिसऱ्या यादीनुसार प्रवेश निश्चिती - २५ ते २८ सप्टेंबर

- चौथी फेरी - २५ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर

- चौथी गुणवत्ता यादी - ३ ऑक्टोबर

- चौथ्या यादीनुसार प्रवेश निश्चिती - ४ ते ७ ऑक्टोबर