शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात टेलरच्या दुकानाला आग, 4 लाखांचे कपडे जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 13:04 IST

सेंट्रल फुले मार्केटमधील घटना

ठळक मुद्देपिंप्राळ्यात गादीच्या दुकानात आग 50 तयार ड्रेस जळाले

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 29 -  सेंट्रल फुले मार्केटमध्ये दुस:या मजल्यावर मयुर टेलर्स या दुकानाला रविवारी सकाळी अचानक आग लागली. त्यात शिलाई मशीन, काऊंटर, शिवून तयार केलेले ड्रेस व कच्चे कपडे असा 3 लाख 95 हजाराचा ऐवज जळून खाक झाला आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.जितेंद्र वल्लभभाई हिंगू (वय 41, रा. आदर्श नगर, जळगाव) यांचा टेलरींगचा व्यवसाय असून सेंट्रल फुले मार्केटमध्ये दुस:या मजल्यावर 45 क्रमांकाच्या दुकानात त्यांनी मयुर टेलर्स नावाने व्यवसाय सुरु केला आहे. या दुकानात अन्य कारागिरांकडूनही काम केले जाते. सकाळी साडे आठ ते रात्री 9 या वेळेत दुकानात कामकाज चालते. रविवारी सकाळी साडे आठ वाजता जितेंद्र हे परिवारासह लांडोरखोरी उद्यानात फिरत असताना दुकानातील कारागीर प्रदीप सोनवणे (रा.मेहरुण, जळगाव) यांनी दुकानात आग लागल्याची माहिती दिली. सोनवणे हे दुकानाची साफसफाई करण्यासाठी गेले असता आतून धूर येत असल्याचे लक्षात आले. त्यांनी दुकान उघडून पाहिले असता दुकानातील मशिन, लाकडी कांऊटर, कच्चे कपडे, कॅनव्हास व शिवलेले कपडे जळालेले होते. अगिAशमन दलाचा बंब मागविण्यात आला, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे लोकांचे 50 तयार ड्रेस जळाले    आहेत.पिंप्राळ्यात गादीच्या दुकानात आगपिंप्राळा येथील वखार जवळ गादीच्या दुकानात रविवारी दुपारी अचानक लागली होती. त्यात गादी भरण्यासाठी लागणारा कापूस जळून खाक झाला आहे. अमिन शेख भिकन पिंजारी यांच्या मालकीचे पिंप्राळ्यात दोस्ती गांधी भंडार नावाचे हे दुकान आहे. व्यापारी व शेतक:यांकडून कापूस खरेदी करतात. दुकानात पिंजून ते गाद्या भरुन विक्री करतात. रविवारी या दुकानात अचानक आग लागली. यात दुकानातील कापूस जळून किरकोळ नुकसान झाले आहे.